कोरोनापेक्षा मराठी न्यूज चॅनल्सचा कहर

पुणे - कोरोना व्हायरसमुळे राज्यात विशेषतः पुणे शहर आणि  जिल्ह्यात घबराटीचे वातावरण पसरले  आहे. त्यात अफवांचे पेव फुटत असल्याने लोकांची झोप  उडाली आहे. त्यात मराठी न्यूज चॅनल्सने कोरोना व्हायरसच्या बातम्या देताना कहर केला आहे.

गेल्या दहा दिवसात  टीव्ही ९ मराठीच्या  पुण्यातील दोन बातम्या खोट्या निघाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्युटची खातरजमा न करता फर्ग्युसन कॉलेजची जी बातमी देण्यात आली  ती खोटी निघाली. तसेच मागे सिरम इन्स्टिट्यूटने कोरोनाची लस बनवलेली बातमीही तद्दन खोटी निघाली. यावर राम लेंडेवाड यांनी टीव्ही ९ मराठीला मेल करून त्यांची खरडपट्टी केली आहे.Post a Comment

0 Comments