कोरोनामुळे 'ज्ञानदा' तुफान फार्मात !


कोरोनामुळे देशभरात  २१ दिवस लॉकडाऊन करण्यात आला आहे. कोरोनाच्या धास्तीने वृत्तपत्र विक्रेत्यांनी घरोघरी जावून वृत्तपत्र वाटप  बंद केल्यानंतर वृत्तपत्र मालकांनी प्रिंटमध्ये वृत्तपत्र बंद देणे आहे, कोरोनामुळे वृत्तपत्रे लॉकडाऊन असली तरी  ईपेपर सुरु केले आहेत.सध्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीत डिजिटल माध्यमाबरोबर न्यूज चॅनल्स सुरु असून, मराठी न्यूज चॅनल्सचा टीआरपी प्रचंड वाढला आहे.

मात्र, ब्रेकिंग बातमी देण्याच्या नादात मराठी न्यूज चॅनल्स अनेक चुका करीत आहेत, एबीपी माझाची एक महिला अँकर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेताच नेटिझन्सनी तिची चांगली धुलाई केली होती. आता एबीपी माझाची प्रसिद्ध न्यूज एंकर ज्ञानदा कदम मीम्समुळे चांगलीच चर्चेत आली आहे. तिच्या चाहत्यांनी ‘काय सांगशील ज्ञानदा ’ या नावाने फेसबुकवर खास पेज  तयार केले आणि या पेजवर ज्ञानदाच्या नावाने कविता, चारोळ्या , मीम्सचा जोरदार पाऊस पडत आहे. 

ज्ञानदा कदम ही चर्चेत येण्याची ही पहिली वेळ नाहीझी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या…’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातही श्रेया बुगडेने ज्ञानदाची नक्कल, विडंबन करून धमाल उडवून दिली होती.  आता नेटिझन्सनी तिची चांगलीच खिल्ली उडवली आहे.


ऐकूनी तुझा आवाज
पाहूनी तुझी अदा
महाराष्ट्र झाला फिदा
२१ दिवस आता फक्त
तुलाच बघायचं ज्ञानदा
काय सांगशील ज्ञानदा …

सोशल मीडियावर अश्या अनेक कविताही ज्ञानदावर पडत असून एबीपी माझा आणि ज्ञानदाने ते खिलाडू वृत्तीने घेत  ‘काय सांगशील ज्ञानदा..’ हा  स्पेशल शो काल प्रसारित  केला केला आहे, 


सोशल मीडियावर मीम्सच्या बाबतीत  अग्रेसर असणाऱ्या खास रे टीव्ही नेहि ज्ञानदावर खास व्हिडीओ तयार केला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या