भोपाळमध्ये पत्रकाराला करोनाची लागण : कमलनाथ अडचणीत

भोपाळ: मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये  एका पत्रकाराला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पत्रकाराच्या मुलीला करोनाची लागण झाल्याचे आधी स्पष्ट झाले. त्यानंतर या पत्रकाराची तपासणी केली असता त्यालाही करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे हा पत्रकार मध्य प्रदेश राजकीय संघर्षाच्या काळात माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या शेवटच्या पत्रकार परिषदाला उपस्थित होता. या मुळे राजकीय क्षेत्रासह भोपाळमधील पत्रकारांमध्ये खळबळ उडाली आहे.

इतकेच नाही, तर या पत्रकार परिषदेला दिल्लीतीलही काही पत्रकार या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. यामुळे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासह काही माजी मंत्री, राजकीय नेते आणि पत्रकारांना क्वारंटाइनमध्ये जावे लागण्याची शक्यता आहे.

आज तक या वृत्त वाहिनीने हे वृत्त दिले आहे. या घटनेमुळे आता या पत्रकाराच्या संपर्कात आलेल्या सर्व पत्रकारांना क्वारंटाइन व्हावे लागणार आहे. या बरोबरच या पत्रकार परिषदेत प्रशासनाकडून जे नेत या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले होते, अशा नेत्यांची आणि अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात येत आहे. या पत्रकार परिषदेला कमलनाथही उपस्थित होते, मग कमलनाथ यांनाही क्वारंटाइनमध्ये ठेवले जाईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


दिल्लीचे पत्रकारही होते उपस्थित

माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यापूर्वी एक भोपाळमध्ये एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत केवळ भोपाळचेच नाही, तर दिल्लीतील काही पत्रकारही उपस्थित होते. हे पाहता दिल्लीतील किती पत्रकार या परिषदेला उपस्थित होते, आणि ते दिल्लीत परतल्यानंतर कोणाच्या संपर्कात आले याचीही पाहणी करावी लागणार आहे. शिवाय या सर्व पत्रकारांची तपासणीही करण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, असे सांगितले जात आहे.

दरम्यान, कमलनाथ हे या पत्रकाराच्या जवळून संपर्कात आले होते का, किंवा आणखी कोण पत्रकार वा नेते या पत्रकाराच्या संपर्कात आले याचाही तपास केला जाणा आहे.  

Post a Comment

0 Comments