मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे, लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा सोडल्यास सर्व व्यवहार बंद राहणार आहे, याचा परिणाम लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या वृत्तपत्रांवरही झाला असून राज्यातील अनेक वृत्तपत्र अनिश्चित काळासाठी बंद झाले आहेत .
कोरोनाच्या धास्तीमुळे वृत्तपत्र वितरण संघटनांनी वृत्तपत्र वितरण करणार नाही, असे जाहीर केल्यामुळे याचा थेट परिणाम वृत्तपत्रांवर झालेला आहे. त्यामुळे राज्यातील आघाडीचे वृत्तपत्र लोकमत. सकाळ, पुण्यनगरी, पुढारी, दिव्य मराठी, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, देशोन्नतीसह जिल्हास्तरीय वृत्तपत्रे बंद झालेली आहेत.
वृत्तपत्रांचे वितरण होणे हे एक अविभाज्य घटक आहे. अगोदरच ई-पेपर्सची वाढती संख्या बघता वर्तमानपत्र अडचणीत आलेले आहेत यात आता लॉकडाऊन झाल्यामुळे असंख्य वार्ताहर, संपादक,इतर कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार की अशी भीती निर्माण झाली आहे.
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या वर्तमानपत्रावर ही पहिल्यांदा वेळ आलेली आहे. मात्र ई-पेपर्सची आणि ई-पोर्टलचा वाचक वाढला असून, डिजिटल मीडियाला चांगले दिवस आले आहेत.
0 टिप्पण्या