पुढारीची मराठवाडा आवृत्ती गुंडाळण्याची शक्यता

 औरंगाबाद - तीन वर्षांपूर्वी सुरु झालेली पुढारीची  मराठवाडा आवृत्ती गुंडाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील जिल्हा कार्यालय १ मे पासून बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता हेड ऑफिसमधील जवळपास २३ जणांचे राजीनामे घेण्यात येत आहेत. त्यामुळे पुढारी आपली मराठवाडा आवृत्ती बंद करणार की काय ? अशी शंका  निर्माण झाली आहे. 

पुढारी औरंगाबादेत सुरु होणार अशी हवा अनेक वर्षे सुरु होती. अखेर ६ जानेवारी २०१७ रोजी पुढारीची मराठवाडा आवृत्ती सुरु झाली होती.  सध्या धनंजय लांबे -कार्यकारी संपादक, कल्याण पांडे -व्यवस्थापक, उमेश काळे- वृत्तसांपादक  आहेत. हे तिघे वगळता अन्य जवळपास २३ जणांचे राजीनामे मागण्यात आले आहेत. त्यात उपसांपादक, रिपोर्टर, कॉम्पुटर ऑपरेटर, संपादकीय, वितरण आणि जाहिरात विभागातील कर्मचारी आहेत. त्यामुळेसर्वच्या सर्व कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत. 

पुढारीने मराठवाड्यातील जिल्हा कार्यालय १ मे पासून बंद करून जिल्हा प्रतिनिधी वगळून अन्य कर्मचाऱ्यांचे राजीनामे घेतले आहेत. आता हेड ऑफिसमधील २३ जणांचे राजीनामे मागण्यात आल्याने आवृत्ती बंद होण्याची शंका निर्माण झाली आहे. 

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्मचाऱ्यांना काढू नका असे आवाहन करीत असताना, पुढारीने कर्मचाऱ्यांना घरी पाठवून कर्मचाऱ्यावर आर्थिक आणीबाणी लादली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या