पनवेल - संचारबंदीच्या काळात गरीब महिलेच्या असाहय्यतेचा फायदा घेऊन तिची लुट करणाऱ्या पनवेलमधील कुप्रतिष्ठेची लाल कातडी पांघरलेल्या रुग्णवाहिका चालकानेच उलट्या बोंबा ठोकत पोलिसात धाव घेतली होती. रुग्णवाहिका चालक आणि पीडीत महिलेने ही तक्रार दाखल केली असल्याच्या बातम्या ‘लाल कातडी’च्या स्वतःला समाजसेवक म्हणवणाऱ्याने समाजमाध्यमांवर फिरवल्या. पण मुळात त्या चालकाच्या तक्रारीचा व आपला काहीच संबंध नसल्याचे संबंधीत महिलेने पोलिसांना दिलेल्या जबानीत स्पष्ट केले आहे. तसेच त्या चालकानेच जास्त पैसे उकळल्याची तिने आपल्या जबानीत सांगितले.
काय आहे वस्तूस्थिती ?
उदय भविष्यपत्र मध्ये २२ एप्रिलला बातमी प्रकाशित झाल्यानंतर प्रत्यक्ष गावातील चंदा पूलजवार यांच्या घरी भेट देऊन त्यांची चौकशी केली. त्यावेळी चंदा पूलजवार यांनी धक्कादायक माहिती दिली. चंदा यांनी सांगितले, की पेपरात बातमी आल्यानंतर रुग्णवाहिकेवरील चालक पुन्हा घरी आला. त्याने घरमालकासोबत येऊन आम्हाला घर खाली करण्याची धमकी दिली. तसेच माझी आणि माझ्या मूलीकडून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. त्यामुळे आता काय पोलिस झोपी गेले काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
या विषयातील बातमी छापून आल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्याचा बुरखा पांघरुन पनवेलमध्ये गोंधळ घालणाऱ्या लाल कातडीच्या समाजसेवकाच्या रुपातील गावगुंडाच्या इभ्रतीची नाचक्की झाल्यामुळे त्याने चालकाला समोर करुन त्याला बातमी देणाऱ्या उदय भविष्यपत्राच्या बातमीदार आणि संपादकांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करायला पोलिसांना भाग पाडले. शिवाय त्या महिलेच्या घरमालकाला तिचे घर खाली करण्याची धमकी द्यायला लावून कोऱ्या कागदावर त्यांच्या सह्या घेतल्याचे देखील त्या महिलेने सांगितले आहे.
खारघर परिसरातील पेठ या गावात चंदा पूलजवार ही महिला तिच्या दोन मुलींसह वास्तव्यास आहे. घरोघरी लोकांची धुणी-भांडी करून त्या आपला संसार चालवतात. काही महिन्यांपूर्वीच यवतमाळ जिल्ह्यातून त्यांची आई लक्ष्मीबाई येलज्जवार (वय ७५) वास्तव्यास होत्या. परंतू 20 एप्रिलला सोमवारी त्यांना अत्यवस्थ वाटत असताना सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यामुळे पुढील सोपस्कार पूर्ण करण्यासाठी डॉक्टरांच्या दाखल्याची आवश्यकता होती. त्यासाठी चंदा यांनी एका परिचितामार्फत पनवेलमधील एका प्रतिष्ठित सामाजिक संस्थेच्या रुग्णवाहिका चालकाशी संपर्क केला.
खारघर येथून पनवेल उपजिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी आणि पुढे अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी रुग्णवाहिका चालकाने मृतकाच्या नातेवाईकांकडून 10 हजाराची मागणी केली. कोरोनाची भीती असल्यामुळे संचारबंदीच्या काळात पुन्हा आपल्या आईचे अंत्यविधी कोण करेल या भीतीपोटी अखेर चंदा यांनी शेजारपाजाऱ्यांकडून उसणे पैसे घेऊन त्या चालकाला दहा हजार रूपये दिले. परंतू हे पैसे त्याला कमी पडल्यामुळे त्याने अतिरीक्त पाच हजारांसाठी तगादा लावला. याबाबत उदय भविष्यपत्राच्या प्रतिनिधीला माहिती मिळताच त्यांनी दोन्हीकडील बाजू जाणून घेऊन महिलेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. २२ एप्रिलला बातमी प्रकाशित होताच रुग्णवाहिका चालक आणि प्रतिष्ठानबाबत नागरीकांमध्ये तिखट प्रतिक्रीया उमटल्या. अनेकांनी या घटनेचा निषेध व्यक्त करीत संतापजनक प्रतिक्रीया नोंदवल्या.
माजलेलेल्या गेंड्याचा थयथयाट
नवी मुंबई पोलीसांनी अब्रुनुकसानीबाबत अदखलपात्र गुन्हा नोंद करून केलेल्या घोडचूकीचा पनवेलमधील एका स्वयंमघोषीत समाजसेवकाने गैरफायदा घेतला आहे. या हप्तेखोर आणि खंडणीबहाद्दर समाजसेवकाने विविध समाजमाध्यमांवर खोटे आणि तथ्यहिन असणारे संदेश करून व्हायरल करून थयथयाट करीत त्याची पातळी दाखवून दिली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात सदर महिलेच्या नावाचा देखील त्याने वाईट पध्दतीने वापर केला.
0 टिप्पण्या