खांडेकर आता तरी डोळे उघडा !


यश मिळविणे जसे कठीण असते तसेच यश पचवणे त्याहून कठीण असते. एबीपी माझाचे अगदी तसेच झालेय. रोज नव्या चुका घडत आहेत. अनेक वर्षे अँकर म्हणून काम करणाऱ्या प्रसन्न जोशी याने काल बोलता बोलता कोरोना ... गेला म्हणाला. त्याची शाई वाळते न वाळते तोच आज अँकर हर्षदा सकुळ हिने सोलापूरच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा रामतीर्थकर यांच्या निधनाचे वृत्त देताना सकारात्मक बातमी म्हणाली. त्यामुळे नेटिझन्स एबीपी माझा डोक्यावर पडला का ? म्हणून ट्रोल करताहेत.
आता ही चूक स्क्रिप्ट रायटरची की अँकरची ? समोर स्क्रीनवर जे लिहिलेले असते, तो अँकर वाचतो, पण अगोदर स्क्रिप्ट वाचन केले जात नाही का ? जर काही चुकले तर ऑन एअर माफ करा, असे अँकरने म्हणायला हवे, पण तसे न करता घोडे पुढे दामटून नेले जाते. त्यांना वाटते ही चूक कोणाला कळणार नाही, पण नेटिझन्स इतके हुशार आहेत की युट्युब लाइव्ह आणि जियो अँपवर जावून तो चुकलेला व्हिडीओ लगेच शोधून काढून सोशल मीडियावर व्हायरल करतात. पूर्वी अश्या चुका घडायच्या पण कुणाच्या लक्षात येत नव्हत्या, पण नेटिझन्स आता सजग झालेत.
एबीपी माझा नेहमीच तोंडावर पडत आहे. 'सावरकर नायक की खलनायक' पासून एबीपी माझाला ट्रोलिंग मोठ्या प्रमाणात सुरु झाले आहे. मध्यंतरी रेल्वेच्या फेक बातमीनंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर हे चॅनल पुन्हा ट्रोल झाले.त्यानंतर काल प्रसन्न जोशी तर आज हर्षदा सकुळ. मध्यंतरी एक महिला अँकरने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले होते.
या चुका वारंवार का घडत आहेत ? एबीपी माझामध्ये एक चौकडी निर्माण झाली आहे. त्यामुळे बातम्यांची 'खिचडी' कच्ची शिजत आहे. खांडेकरला या चौकडीने ताब्यात ठेवले आहे. त्यामुळे खांडेकर डोळे मिटून त्यांच्या चुका पदरात घालून घेत आहेत.
वारंवार चुका घडत आहेत. फेक बातम्या समोर येत आहेत,त्यामुळॆ एबीपी माझावरील लोकांचा विश्वास उडत चालला आहे. त्यामुळे 'उघडा डोळे, बघा नीट' म्हणणाऱ्या माझाचे डोळे एक दिवस कायमचे बंद होणार म्हणजे टीआरपीमध्ये चौथ्या क्रमांकावर जाणार, अशीच चिन्हे दिसत आहेत.तेव्हा खांडेकरजी आता तरी डोळे उघडा...
- बेरक्या उर्फ नारद
एबीपी माझाला नेमके झाले तरी काय ? कधी फेक बातम्या, कधी .... शब्द आता निधनाची बातमी सकारात्मक ? उघडा कान, ऐका नीट ! एबीपी माझावाले डोक्यावर पडले आहेत का ? असा सवाल नेटिझन्स करीत आहेत...
Posted by बेरक्या उर्फ नारद on Tuesday, 28 April 2020

Post a Comment

0 Comments