राज्य सरकारचा युटर्न : वृत्तपत्र घरपोच वितरण करण्यास परवानगी


मुंबई- वृत्तपत्र प्रिंट करा पण घरोघर वाटप करू नका, हा आदेश राज्य सरकारने मागे घेतला आहे. यासंदर्भात नागपूर खंडपीठातही याचिका दाखल करण्यात आली होती, त्याचा निर्णय येण्याअगोदर राज्य सरकारने काही अटीवर घरोघर वृत्तपत्र वितरण करण्यास परवानगी दिली आहे.

लॉकडाउनचा दुसरा टप्पा लागू केल्यानंतर केंद्रानं २० एप्रिलपासून काही क्षेत्रांना कामकाज करण्यास सर्शत परवानगी दिली होती. मात्र, यातून वृत्तपत्रांच्या घरपोच वितरणास परवानगी नाकारण्यात आली होती.

यासंदर्भात चर्चा केल्यानंतर सरकारनं निर्णय बदलला असून, मुंबई, पुणे आणि करोग्रस्त कंटेनमेंट झोन वगळून इतर ठिकाणी वृत्तपत्र वितरण करण्यास परवानगी दिली आहे. वृत्तपत्र वितरण करणाऱ्या व्यक्तींनी हे काम करताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचे निर्देशही सरकारनं दिले आहेत.

Post a Comment

0 Comments