मुंबई - "उघडा डोळे, बघा नीट" वृत्तवाहिनीच्या एका रिपोर्टरला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर या प्रतिनिधीला तातडीने कोरोनाग्रस्तांसाठीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रिपोर्टरबरोबर सोबत असलेल्या कॅमेरामनही संकटात सापडला आहे.
एका कोरोनाग्रस्त पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आल्यानंतर या रिपोर्टरला ही लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, संबंधित शहरातील पत्रकार संघटनेचे कार्यालय देखील तातडीने बंद करण्यात आले आहे. तसेच या कार्यालयात येणाऱ्या सर्व पत्रकारांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती मिळते. यासोबतच हे पत्रकार ज्या ज्या लोकांच्या संपर्कात आले होते त्यांची देखील तपासणी करण्यात येणार आहे, अशीही माहिती मिळते.
वृत्तवाहिन्या या अत्यावश्यक सेवेत येत असल्याकारणाने अनेक प्रतिनिधी आपल्या जीवाची परवा न करता वार्तांकनासाठी ठिकठिकाणी जात आहेत. लोकांपर्यंत अचूक माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आता अधिक काळजी घेण्याचीची गरज भासू लागली असून कोरोनाचा वेगान होणारा प्रसार थांबवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून तसेच आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे कठोर पालन होणे आवश्यक आहे.
1 टिप्पण्या
हे फार वाईट झालं राव..
उत्तर द्याहटवाबिचारे जीवावर उदार होऊन रिपोर्टिंग करतात..
लवकर बरा होऊ दे तो..
-मिथिला सुभाष