महिला रिपोर्टरच्या ट्विटला अश्लील भाषेत उत्तर , गुन्हा दाखलनाशिक : उघडा डोळे बघा नीटच्या एका  महिला रिपोर्टच्या  ट्विटला अश्लील भाषेत उत्तर दिल्याने नाशिक येथील एचएएल कर्मचारी व भाजपाचा माजी प्रसिद्धी प्रमुख विजयराज जाधव याच्यावर ओझर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.


मुंबईत उघडा डोळे बघा नीट चॅनलमध्ये रिपोर्टर म्हणून काम करणाऱ्या एका महिला रिपोर्टरने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाला अनुसरून आपले मत ट्विटर द्वारे व्यक्त केले असता त्यांच्या ट्विटरला नाशिक विभागातील एच.ए.एल कर्मचारी तथा भाजपाचा माजी प्रसिद्धी प्रमुख विजयराज जाधव यानी अर्वाच्च्य व अश्लील भाषेत प्रत्युत्तर दिल्यानंतर याबाबत महिला पत्रकार यांनी याविरुध्द तक्रार ऑनलाइन पद्धतीने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, पोलीस महासंचालक पासून ते थेट नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक आरती सिंह यांच्यापर्यंत केल्यानंतर या सर्वांना जाधव याच्यावर कारवाईची मागणी केली.

यानंतर पोलिसांनी तातडीची पाऊले उचलत विजयराज जाधव याला उमराणे (ता.देवळा) येथून ओझर पोलीसांच्या ताब्यात दिले असता ओझर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय चाचणी केली असता त्याचा रक्तदाब वाढल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. विजयराज जाधव याच्यावर कलम ३५४ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे करत आहे.

Post a Comment

0 Comments