राहुल कुलकर्णी यास जामीन मिळाला, पण... मुंबई - कोरोना विषाणूचा संसर्ग आणि कारागृहात कैद्यांची गर्दी  यामुळे फेक न्यूज देणारा एबीपी माझाचा रिपोर्टर राहुल कुलकर्णी यास जामीन  मिळाला आहे. सध्या त्याची १५ हजारच्या जामीनवर सुटका झाली असून त्यास लॉकसंपल्यानंतर आणखी २० हजार भरायचे आहेत. तसेच कुलकर्णी यास  होम क्वॉरंटाईन होण्यास बजावले आहे. नंतर डॉक्टरकडून तपासणी करून न्यायालयात हजर व्हायचे आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याची सविस्तर बातमी दिली आहे.

मात्र एबीपी माझाने कुलकर्णी यास जामीन मिळल्याची बातमी देताना वस्तुस्थिती दाबून टाकली. वांद्रे घटनेचा आणि एबीपी माझाच्या बातमीचा काहीही संबंध नाही, हा दावा न्यायालयाला पटलेला नाही. महाराष्ट्रात दोन दिवस अगोदरच लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्यानंतर बातमी आली कशी असे न्यायालयाचे म्हणणे आहे.


आरोपी राहुल कुलकर्णीला न्यायालयीन कोठडी सुनावताना बांद्रा कोर्टाने आपल्या आदेशात नोंदवलेले मुद्दे.

1)आरोपीची बातमी संभ्रम पसरवणारी होती.
2)आरोपीने ब्रेकींग न्युजसाठी बेजबाबदारपणे वृत्तांकन केले.
3)साथीच्या रोगासारख्या परिस्थितीत आरोपीने जबाबदारपणे कर्तव्य पार पाडले नाही.
4)माध्यमे जनतेला प्रभावी करु शकतात.
5)अशा घटना रोखण्यासाठी पोलीसांनी केलेली कारवाई योग्य आहे.
6)आरोपीचे कृत्य ऑनलाईन उपलब्ध आहे.
7)आरोपीला 30 एप्रिलपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावण्यात येत आहे.

आरोपीला मिळालेल्या सशर्त जामीन आदेशामधील मुद्दे.
1)आरोपीने त्याला डायबेटिस व रक्तदाबाचा विकार असल्याचे सांगितले आहे. आधीच तुरुंगात क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. आरोपीला हाय रिस्क झोनमधून प्रवास करत आणल्याने त्याला अशा परिस्थितीत तुरुंगात ठेवण्याऐवजी खालील अटी शर्थींवर जामीन देऊन सोडण्यात येत आहे.
2)आरोपीला सध्या 15 हजार रुपयांच्या पर्सनल बाँडवर सोडण्यात येत आहे. लॉकडाऊननंतर एका आठवड्याच्या आत आरोपीने 20 हजार रुपयांच्या शुअरटी बाँडची पुर्तता करावी.
3)आरोपीने जामीनावर सोडल्यावर 15 दिवसांकरता होम क्वारंटाईन व्हावे.
4)जामीनावर सुटल्यावर आरोपीने पुराव्यांशी छेडछाड करु नये तसेच साक्षीदारांवर दबाव आणू नये.

राहुल कुलकर्णी यास जामीन मिळाला, पण... https://www.berkya.com/2020/04/mumbai-osmanabad-abp-majha-rahul-kulkarni-fake-news.html
Posted by Berkya Narad on Saturday, 18 April 2020

Post a Comment

0 Comments