औरंगाबादेत दिव्य मराठी मध्ये कॉस्ट कटिंग सुरु



औरंगाबाद - भोपाळशेठच्या दिव्य मराठी मध्ये कॉस्ट कटिंग सुरु झाली आहे. विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक सचिन काटे , डीबी स्टार प्रमुख रुपेश कलंत्री, डेप्युटी न्यूज एडिटर  ( सिटी ) बालाजी सूर्यवंशी, सिनियर रिपोर्टर  दत्ता  सांगळे  यांच्यासह सात जणांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे.

अगोदरच  तोटयात असलेल्या दिव्य मराठीला कोरोनाचा मोठा झटका बसला आहे. त्यामुळे ३० ते ४० टक्के कॉस्ट कटिंग करण्याचा निर्णय भोपाळशेठने घेतला आहे. कुणाला नारळ द्यायचा याचा निर्णय झाला असल्याचे समजते.

ज्या ठिकाणी आवृत्ती नाही पण ब्युरो ऑफिस आहेत,  ते म्हणजे मुंबई, पुणे आणि नागपूर  मधील अनेकांना नारळ देण्यात येणार आहे.  तसेच हेड ऑफिस मधील अनेकांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. तसेच डीबी स्टार पुरवणी  बंद करण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या