औरंगाबाद - लोकमतच्या औरंगाबाद आवृत्तीचे संपादक सुधीर महाजन यांना मुदतवाढ मिळणार की नवा संपादक येणार ? याकडे मराठवाड्यातील लोकमत कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. महाजन यांना मुदतवाढ न मिळाल्यास नवे संपादक म्हणून कोणाची वर्णी लागणार , यावर चर्चा झडत आहे.
संपादक सुधीर महाजन हे ३१ मे २०१९ मध्ये सेवानिवृत्त होणार होते, परंतु त्यांना एक वर्षे मुदतवाढ मिळाली होती. यंदा पुन्हा मुदतवाढ मिळावी, म्हणून ते प्रयत्नशील आहेत.बाबूजी महाजन यांना मुदतवाढ देणार की नाही, याकडे लक्ष वेधले आहे.
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे वृत्तपत्रावर मोठे संकट ओढवले आहे. खप २५ टाक्यावर आला आहे. लॉकडाऊन कधी संपणार आणि गाडी कधी रुळावर येणार ? हे कुणीच संगी शकत नाही. त्यामुळे लोकमतने कर्मचाऱ्यांच्या वेतनात १० ते ३० टक्के कपात सुरु केली आहे तर जे कर्मचारी सेवानिवृत्त होऊन पुन्हा करार पद्धतीने कामावर आले आहेत, त्यांचे तर ६० टक्के वेतन कापले जात आहे. महाजन यांना सध्या ४० टक्केच वेतन मिळते, त्यामुळे ४० टक्के वेतनात जर पूर्ण वेळ संपादक मिळत असेल तर बाबूजी व्यवहारी निर्णय घेणार की नव्या चेहऱ्याला संधी देणार याकडे लक्ष वेधले आहे.
महाजन यांना मुदतवाढ न मिळाल्यास संपादक म्हणून नंदकिशोर पाटील ( मुंबई ) , धर्मराज हल्लाळे ( लातूर ) यांची नावे आघाडीवर आहेत.
नंदकिशोर पाटील यांच्यावर बालाजीचा आशीर्वाद आहे तर
धर्मराज हल्लाळे यांच्यावर ऋषी बाबूचा वरदहस्त आहे. महाजन पाठोपाठ दुसरे संपादक चक्रधर दळवी डिसेंबर 2020 मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे एका पाठोपाठ नंदकिशोर पाटील आणि धर्मराज हल्लाळे या दोघांची यांची वर्णी लागू शकते.
0 टिप्पण्या