औरंगाबाद शहरात एका दैनिकाचा रिपोर्टर कोरोना पॉजिटीव्ह 


औरंगाबाद शहरातील एका साखळी वृत्तपत्राच्या रिपोर्टरला कोरोनाने घेरले आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या या रिपोर्टरमुळे त्याच्या आईला देखील कोरोनाची बाधा झाली आहे.  या दोघांना  घाटी हॉस्पिटलमध्ये  उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

कोणतेही सोशल डिस्टन्सिंग न पाळता या दैनिकाचे काम सुरु होते. फिल्डवर काम करणाऱ्या रिपोर्टरला ऑफिसमध्ये बोलावले जात होते, त्याचा फटका या दैनिकांस बसला आहे. कोरोना बाधित रिपोर्टरच्या संपर्कात अनेक कर्मचारी आले होते , अशी माहिती आहे.  त्यामुळे संपूर्ण ऑफिसमधील कर्मचारी अडचणीत आले आहेत,  सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी सुरु करण्यात आली आहे. 

या दैनिकाने आपल्या कर्मचाऱ्यांना मास्क दिले नाहीत किंवा ऑफिसमध्ये  हँड सॅनिटायझर   ठेवले नाही. कर्मचारी आपल्या पैश्याने हँड सॅनिटायझर आणत होते. या दैनिकाने गेल्या काही दिवसांत अनेक कर्मचाऱ्याना कमी केले असून  मुख्य संपादक आणि सांगली संपादकास नारळ दिला आहे. अनेकांचे वेतन सुद्धा कापले आहे. मालकाने संकटाच्या काळात कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. 

औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या २९१ गेली आहे. औरंगाबाद शहर कोरोना हॉटस्पॉट झाले आहे. अश्या परिस्थितीमध्ये कर्मचारी जीव मुठीत धरून काम करीत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या