'माने' या न 'माने' पण हे कथन सत्य आहे. महाराष्ट्राच्या मानबिंदू मध्ये पाच वेळा इन - आऊट केल्यानंतर सहाव्या वेळी एंट्री केल्यानंतर आता निवृत्ती मानबिंदू मधूनच घ्यायची, असा निर्णय घेतला. सलग तेरा वर्षे काम कमी आणि बाबूजींची चापलुसी करण्यात धन्यता मानत कोल्हापुरात 'राजा बोले दल हाले' वजन निर्माण केले. वजन इतके वाढले की, आमदार, खासदार, मंत्री त्यांचे ऐकू लागले. त्यामुळे मानबिंदूचे आपणच सर्व्हेसर्वा आहोत असा जणू त्यांना गर्वच झाला, बाबुजीही परेशान झाले, आपण मालक असून, नोकराला इतका मान ? हे पाहून त्यांनी त्यांची सोलापुरात बदली केली. सात जिल्ह्याची जहागिरी केवळ एका जिल्ह्यावर आली. तरीही गाव जवळ म्हणून समाधान मानले. पण मानबिंदूच्या 'बालाजी'च्या 'जवळ' असणाऱ्यांची साताऱ्याहून सोलापुरात बदली झाली आणि दल पुन्हा औरंगाबादला हालले.
येथे राजकीय संपादक म्हणून बिरुद दिले पण मुंबईत बसून 'अतुल' नीय कामगिरी करणाऱ्यामुळे हे बिरुदही गळून पडले. आतल्या आत घुसमट सुरु झाली, तरीही चेहऱ्यावर खोटे हासू आणून दीड वर्षे कसेबसे काढले. निवृत्तीचा काळ समीप आला. एक वर्षे राहिले म्हणून बाबूजींला दंडवत घालून पुन्हा गावी सोलापुरात नियुक्ती करावी म्हणून गळ घातला. बाबूजी विचार करू लागले. ही वार्ता कळताच बालाजीने बाबूजींच्या कानात सांगितले आता यांना कायम निरोप द्यावा. मग काय, बाबूजींनी सरळ सांगितले, राहिलेला एक वर्षाचे वेतन घ्यावे आणि गावी कायमची निवृत्ती घ्यावी. त्यानंतर नारळ देऊन भावपूर्ण निरोप देण्यात आला. पाच वेळा इन- आऊट केले पण इतकी कधी घुसमट झाली नाही, शेवटी बालाजी रुसल्यामुळे 'राजा बोले दल हाले'' असे घडलेच नाही.
कालाय तस्मै नमः ।
- बेरक्या उर्फ नारद
0 टिप्पण्या