लोकमतमध्ये कॉस्ट कटींग सुरु

पंढरपूर विभागीय कार्यालय बंद होणार ? 


सोलापूर - कोरोना  संकटामुळे  प्रिंट मीडिया मध्ये मोठ्या प्रमाणात कॉस्ट कटिंग ला सुरुवात झाली आहे.  काहींनी आपल्‍या कर्मचाऱ्यांच्या पगारात  10 ते 30 टक्के पर्यंत कपात करण्यास सुरुवात केली होती. दैनिक लोकमतने 20 मे रोजी राज्यातील विविध आवृत्त्यांमधील उपसंपादकांचे तडकाफडकी राजीनामे घेतले आहेत. 

पहिल्या टप्प्यातील ही कपात मानली जात आहे. यामध्ये विविध विभागांचा समावेश आहे. दररोज लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे , त्यामुळे व्यवस्थापकांना कडून अशा प्रकारचे निर्णय घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. सोलापूर कार्यालयांतर्गत पंढरपूर विभागाचे उपसंपादक सत्यवान उर्फ सतीश बागल यांचाही राजीनामा 20 तारखेला तडकाफडकी घेण्यात आला. 

सोबतच गोवा व इतर आवृत्त्यांमधील कर्मचारी कपातीला सुरुवात झाली आहे. यामुळे सर्वच कार्यालयांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. सोलापूर जिल्ह्यातील खप अचानक खप कमी झाल्यामुळे तसेच जाहिरातीचा बिझनेस डाऊन झाल्यामुळे सहाय्यक सरव्यवस्थापक रमेश तावडे निवासी संपादक सचिन जवळकोटे यांनी जो सेट अप उभारण्याचा प्रयत्न केला होता तो आता ढासळून चालू लागला आहे. कर्मचारी कपातीमुळे अधिकच वातावरण डिस्टर्ब झाले असून, एक मे नंतर पंढरपूर विभागीय कार्यालय ही बंद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.Post a Comment

0 Comments