नंबर १ चॅनल मधील १५ जणांना कोरोनाने घेरलेमुंबई - गेल्या दोन आठवड्यापासून नंबर १ असलेल्या एका न्यूज चॅनलच्या स्टुडिओ मधील जवळपास १५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाच्या बातम्या देता - देता या चॅनल मधील अनेकांना कोरोनाने ग्रासले आहे. 

कोरोना विषाणूने जगभर हाहाकार उडवलेला असताना, त्यापासून बचाव कसा करावा हे सांगणाऱ्या या चॅनलच्या हेडने कसलेली सोशल डिस्टेंसिंग पाळले नाही. आजपर्यंत वैद्यकीय चाचणी घेतली नाही. कुणी आजारी पडले तर सुट्टी दिली नाही. महामारीच्या काळात नंबर १ कसे राहू या हट्टाहासामुळे कर्मचाऱ्यांना बळी देण्याचे धोरण आखल्यामुळे या चॅनलच्या स्टुडिओ मधील जवळपास  १५ जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. 

या १५ जणांच्या संपर्कात जवळपास सर्वच कर्मचारी आल्याने सर्वांची आता झोप उडालेली आहे. 

Post a Comment

0 Comments