'उघडा डोळे बघा नीट' मधील टॉपच्या महिला अँकरला कोरोना


मुंबई -  कोरोनाने 'आता उघडा डोळे, बघा नीट' चॅनलमध्ये शिरकाव केला आहे. गंभीर बाब म्हणजे दोन महिला न्यूज अँकरला कोरोनाची बाधा झाली असून त्यात एक सर्वात टॉपची अँकर आहे.चांगल्या समाजासाठी चॅनल व्हाया हा कोरोना आल्याचे समजते.
चांगल्या समाजासाठी चॅनल मधील जवळपास १६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी एकाची पत्नी  'उघडा डोळे, बघा नीट' चॅनल मध्ये न्यूज अँकर मध्ये काम करते. त्याच्यामुळे  तिला आणि तिच्या संपर्कांमुळे  टॉपच्या एका महिला अँकरला कोरोना झाला आहे. 
ही अँकर सर्वात जुनी आणि लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या टॉपच्या महिला अँकरला कोरोना झाल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या