महाराष्ट्र राज्य पञकार संघाच्या पाठपुराव्याला यश
मुंबई - महाराष्ट्र राज्य पञकार संघ नेहमीच पञकारांच्या पाठीशी उभा सतो. त्यात कोरोना साथरोगाच्या काळात ही पञकार संघाने महाराष्ट्रभर स्तुत्य उपक्रम राबवले.कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रोगाचा धोका पत्करुन पञकार ,वार्ताहर अचूक वार्तांकन करत आहेत.हाच मुद्दा लक्षात घेऊन लाॕकडाऊन च्या पहिल्या टप्प्यात राज्य पञकार संघाचे मार्गदर्शक संघटक संजयजी भोकरे यांनी पञकारांना एक कोटी विमा कवच जाहीर करण्याची मागणी सरकार कडे केली होती. तसेच पोलीस ,डाॕक्टर ,आरोग्य सेवक हे कोरोनायोध्दा आहेत तसेच पञकार हा सुध्दा कोरोना योध्दा असून शासनाने दुर्लक्ष करु नये असे वारंवार म्हटले होते.
महाराष्ट्रातील सर्वच विभागातील पञकार बांधवांकडून तसेच पञकार संघाकडून विमा संरक्षण तसेच पॕकेज ची मागणी करण्यात आली होती.अशातच काल आरोग्य मंञी राजेश टोपे यांनी कोरोना काळात कर्तव्यावर असणारा पञकार मृत्यूमुखी पडला तर त्यास पन्नास लाखाचे विमा कवच मिळणार असल्याचे स्पष्ट केले.माञ त्या पञकारास संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकार्याने पञकार असल्याचे पञ द्यावे लागणार.
महाराष्ट्र राज्य पञकार संघाने शासनाकडे पॕकेज सह अनेक योजना, सवलती, विमा कवच याची मागणी जोर लावून धरलेली आहे .त्यातील पञकारांना पन्नास लाखाचे विमा कवच मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र राज्य पञकार संघाच्या पाठपुराव्याला यश मिळाल्यामुळे पञकार वर्गातून समाधान व्यक्त होत आहे . पञकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे , कार्यध्यक्ष राकेश टोळ्ये ,किरण जोशी ,प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ देशकर ,राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे ,प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव,मंञालय मुख्य संपर्क प्रमुख नितीन जाधव यांनी आरोग्य मंञी राजेश टोपे यांचे आभार मानले आहेत.
0 टिप्पण्या