मुंबई - राहा एक पाऊल पुढे म्हणणाऱ्या झी २४ तास मधून
विठोबा सावंत , अजित चव्हाण यांच्यासह सात जणांना नारळ देण्यात आला आहे, त्यामुळे झी २४ तासचे कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत.
झी २४ तास मध्ये संदीप साखरे ( इनपुट हेड ) आणि विठोबा सावंत ( आऊटपूट हेड ) ही जोडी फेमस होती. आशिष जाधव संपादक झाल्यानंतर संदीप साखरे यांना नारळ देण्यात आला होता, त्यानंतर विठोबा सावंत यांचीही विकेट पडणार हे गृहीत धरले जात होते. काही दिवसापूर्वी विठोबाकडून आऊटपुट हेड पद काढून वेबला टाकण्यात आले होते, आता येथूनही नारळ देण्यात आला आहे.
त्याचबरोबर गेले अनेक वर्ष न्यूज अँकर असलेल्या अजित चव्हाण तसेच शिल्पा आपटे, पूनम नार्वेकर, प्रशांत अनासपुरे, दोन ब्युरो
कपिल राऊत ( ठाणे ) व प्रणव पोळेकर ( रत्नागिरी ) यांनाही नारळ देण्यात आला आहे.
1 टिप्पण्या
आपण नि:पक्ष पोस्ट टाकाव्यात हीच अपेक्षा
उत्तर द्याहटवा