ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचं निधन



मुंबई - ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचं आज  निधन झाले. १६ मे रोजी दिनू रणदिवे यांच्या पत्नी सविताताई यांचे निधन झाले होते, बरोबर एक महिन्याने १६ जून रोजी दिनू रणदिवे यांनी आज सकाळी राहत्या घरी वृद्धपकाळाने अखेरचा श्वास घेतला.ते 95 वर्षांच्या होते.

महाराष्ट्राचे धडाडीचे पत्रकार आणि  संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात  दिनू रणदिवे यांचा सहभाग होता. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्र एका मोठ्या इतिहासाच्या साक्षिदाराला मुकला आहे. संयुक्त महाराष्ट्र लढ्यात लालबाग-परळ, आणि हुतात्मा स्माराकात झालेल्या हिंसक आंदोलनाचे दिनू रणदिवे हे साक्षीदार होते.


दिनू रणदिवे यांचा जन्म   पालघर जिल्ह्यातील डहाणु तालुक्यात आदिवासी गावात 1925 साली झाला. 1955 साली सुरू झालेल्या गोवा मुक्ती संग्रामातही ते सहभागी झाले होते.

संयुक्त महाराष्ट्र समितीने 1956 साली सुरू केलेल्या 'संयुक्त महाराष्ट्र पत्रिका' या अनियतकालिकातून त्यांनी पत्रकारितेला सुरवात केली. त्यानंर त्यांनी महाराष्ट्र टाईम्स मध्येही पत्रकारिता केली. दिनू रणदिवे यांनी दिर्घकाळ काम केले. त्यानंतर 1985 मध्ये ते निवृत्त झाले होते.

मागील मे महिन्यात त्यांच्या पत्नी सविता रणदिवे यांचं निधन झालं होतं. त्यानंतरच त्यांची प्रकृती अधिक  ढासळत चालली होती. आज सकाळी त्यांची राहत्या घरी वृद्धापकाळानं प्राणज्योत मालवली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या