'पद्मश्रीं'च्या दैनिकात मुंबई, ठाण्यातही कर्मचारी व वेतनकपात

"आयकर अधिकाऱ्या"सही नारळ !


मुंबई -  पुणे व नाशिक पाठोपाठ 'पद्मश्रीं'च्या दैनिकात आता मुंबई, ठाण्यातही कर्मचारी व वेतन कपात सुरू झाली आहे. यात मंत्रालयात "ऑन ड्युटी स्पेशल ऑफिसर" असल्याच्या थाटात वावरत असलेल्या आयकर अधिकाऱ्या"सही नारळ देण्यात आला आहे. त्यामुळे आता या "आयकर अधिकाऱ्या"ची "छापेमारी" बंद होणार आहे.

'पद्मश्रीं'च्या दैनिकात एकीकडे कर्मचारी कपात आणि ज्याच्याकडून "आय" नाय, त्याला काय नाय, हे धोरण सुरू आहे; तर दुसरीकडे पुण्यातील कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. एक नवीन "पिल्लू" हे कोरोना बाधित आढळल्यानंतर परवा महापालिकेतील अधिकाऱ्यांनी कार्यालयात तपासणी केली. या सर्व पार्श्वभूमीवर 'पद्मश्रीं'च्या दैनिकातील पुण्यातील जुनी "पिल्ले" घाबरली असून आपल्यावर तर कोरोनाचा पुढील "वार" होणार नाही ना, ही भीती त्यांना सतावू लागली आहे. दुसरीकडे थारा नसलेले, वर्षानुवर्षे चिकटून असलेले एक जुने खोड तर कुठून पॉलिटिक्स करत बसलो आणि जगाला ताप करता-करता आता स्वतःला ताप भरणार नाही ना, या भीतीने गारठून गर्भगळीत झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या