औरंगाबाद - दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक भालचंद्र पिंपळवाडकर यांना अखेर नारळ देण्यात आला आहे. पिंपळवाडकर गेल्यामुळे पुण्यनगरीतील त्यांचे काही पंटर अस्वस्थ झाले आहेत.
भालचंद्र पिंपळवाडकर हे गेल्या तीन वर्षांपासून कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत होते. त्यांचे करारपत्र ३१ जुलै रोजी संपताच मालक अरविंद शिंगोटे यांनी मुदतवाढ न देता कायमचा नारळ दिला आहे.
भालचंद्र पिंपळवाडकर यांनी पुण्यनगरी मध्ये राहून एका कंपनीच्या उत्पादनाची साखळी पद्धतीची ( एमएलएम ) स्कीम राबवत होते आणि त्यासाठी वार्ताहरांना प्रेरित करीत होते, त्याची मालकाला कुणकुण लागली होती. कोरोना लॉकडाऊनमुळे पुण्य नगरी तोट्यात सुरु आहे, त्यामुळे पुण्य नगरीने कॉस्ट कटिंग सुरु केली आहे. भालचंद्र पिंपळवाडकर यांना स्किम मुळे काढण्यात आल्याचे अनेकांचे मत आहे.
भालचंद्र पिंपळवाडकर आज पुण्य नगरीच्या सर्व व्हाट्स अँप ग्रुप मधून लेफ्ट झाले, चूक भूल देणे घेणे इतकेच त्यांनी लिहिले आहे. पिंपळवाडकर यांचे नाव १ ऑगस्टपासून प्रिंट लाईन मधून काढण्यात आले आहे.
दरम्यान, पिंपळवाडकर गेल्यामुळे पुण्यनगरीतील त्यांचे काही पंटर अस्वस्थ झाले आहेत. येत्या काही दिवसात आणखी काही जणांची विकेट पडण्याची शक्यता आहे.
0 टिप्पण्या