न्यूज १८ लोकमतने दिवसभर चालवली फेक न्यूज !

बाहुलीला समजले अर्भक  बुलडाणा  - बुलडाणा जिल्ह्यात आज नवलच घडले. चक्क बाहुलीला अर्भक समजून पोस्टमार्टम करण्यात आले. त्याची बातमी न्यूज १८ लोकमतने दिवसभर चालवली, पण बाहुली म्हणून नव्हे तर अर्भक म्हणून. 

 खामगाव तालुक्याच्या बोरजवला गावाजवळील तलावात एक अर्भक आढळून आले मात्र जेव्हा हे अर्भक समजून पोस्ट मार्टम ला नेले तेव्हा मात्र हे अर्भक नसून हे एक बाहुले असल्याचं समोर आलं. एका बाहुल्याला स्त्री जातीचे अर्भक समजण्यात आले होते इथं पर्यंत सर्व ठीक होते , मात्र राज्यातील अग्रगण्य न्युज 18 लोकमत या वाहिनीवर ते स्त्री जातीचे अर्भक असल्याचं दिवसभर दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये दिवसभर संभ्रमाचे वातावरण होते. 

न्यूज १८ लोकमतने दिवसभर चालवली फेक न्यूज ! https://www.berkya.com/2020/07/Buldhana-News18lokmat-Fake-news.html

Posted by Berkya Narad on Friday, 10 July 2020
दैनिक लोकमतच्या वेब आवृत्तीवर जेव्हा हे अर्भक नसून बाहुले असल्याची  बातमी झळकली . त्यानंतरही  न्युज18 लोकमतचे डोळे उघडले नाहीत. त्यामुळे न्यूज18 लोकमतची विश्वासाहर्ता चांगलीच डागाळली गेली आहे. न्यूज चॅनल्स मधून बातम्या क्रॉसचेक होण्याचं प्रमाण अगदी नगण्य झालं आहे. त्यामुळे चॅनल्स वर अशा फेक न्यूज चालवण्याची नामुष्की ओढवली जात आहे.


Post a Comment

0 Comments