मानबिंदूच्या कोल्हापूर आवृत्तीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. वरिष्ठ बातमीदाराचा अहवाल पाॅझिटिव आल्याने खळबळ उडाली आहे. हा बातमीदार गेले तीन महिने कोल्हापुरातील कोरोनाच्या अपडेट सोशल मिडियाद्वारे विशेष बुलेटीनमधून देत होता.
दरम्यान, या वरिष्ठ बातमीदाराकडे मिनी मंत्रालय समजले जाणारे मोठे बीट असून या कार्यालयात गेल्या दोन-तीन दिवसात अनेक पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी त्याच्या संपर्कात आल्याने घबराट पसरली आहे. या कार्यालयातील एक महिला कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे काल उघड झाले होते. दुसर्याच दिवशी हा पत्रकार कोरोनाबाधित झाल्याने भितीचे वातावरण असून संपूर्ण कार्यालय सॅनिटायझर करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. तर या पत्रकारामुळे मानबिंदूचे कर्मचारीही धास्तावले आहेत.
सामान्य जनतेला कोरोनाकालावधीत विविध सल्ले देत आणि कोरोनाच्या मोठ्या प्रमाणावर जाहिराती करत आपणच राज्यात नंबर वन असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे नंबर वनप्रमाणेच कोरोनाकालावधीतही मानबिंदूने मोठ्या प्रमाणात कर्मचार्यांचे सक्तीने राजीनामे घेतले आहेत. यातील काही कर्मचारी खरोखरच अक्षरश: रस्त्यावर आले आहेत.
0 टिप्पण्या