पुढारीची ‘बहार’ घालवणारा कोलाज


दैनिक पुढारीच्या पुरवण्या, विशेषतः बहार ही रविवार पुरवणी -दिवाळी अंक यामध्ये नेहमीच पुढारीचा एक स्वतंत्र ठसा राहिला आहे. लोकसत्ता, सकाळ, मटा स्टाईलपेक्षा पुढारीने नेहमीच आपली स्टाईल, शैली जपली होती. परंतु पद्मश्रींच्या पुढारीमध्ये आलेल्या सचिनने कॉर्पोरेटचे गाजर दाखवत ही शैली धुळीस मिळवली आहे. बहार पुरवणी म्हणजे कोलाज डॉट इन अशी स्थिती करुन ठेवली आहे.

पूर्वी या पुरवणीत अनेक मान्यवरांचे, अभ्यासकांचे लेख असायचे. वाचकांनाही ते आवडायचे. पण सध्या दोन-तीन लेखकांचे ‘कल्पना’तीत लेख वाचून वाचकांना ‘घायाळ’ व्हावे लागत आहे. या लेखांची शैली निबंधात्मक असते, असे थेट वाचकच सांगतात.  याविषयी स्टाफसह वाचकांमधूनही नाराजीचा सूर उमटत आहे. परंतु या सचिनने साहेबांवर अशी मोहिनी घातली आहे की त्याच्या कोलाजमध्ये वरिष्ठ हरपून गेले आहेत. 

लेखाखाली ‘सौजन्य’ छापून पुरवणी काढण्याची वेळ पुढारीवर या सचिनने आणली आहे. तरीही पद्मश्रींचे डोळे उघडत नाहीयेत. गेल्या वर्षीचा दिवाळी अंकही इतरांच्या मागे धावत आणि पुन्हा कॉर्पोरेटचे गाजर दाखवत या सचिनने ताब्यात घेतला; पण पूर्वीचा दर्जेदार, पुढारीस्टाईल अंक हरपल्याने अनेक वाचकांची निराशा झाली. या सचिनने यापूर्वी ‘गोवादूत’मध्येही हेच केले होते. आपल्या टोळक्यातील लेखकांना घुसवून भरमसाठ मानधने काढून हा पेपर डबघाईला आणला होता. नवशक्तीतही त्याला कसलीच चमक दाखवता आली नाही. आता सचिनची हॅटट्रीक होण्याच्या मार्गावर आहे. पण पद्मश्रींचे डोळे उघडले तर...!

वाचकांच्या अनेक प्रतिक्रिया ईमेलद्वारे येत असतात. इतर पुरवण्या सुरु करण्याची मागणी वाचक करत असतात. पण काही चमचे ते वरिष्ठांपर्यंत जाऊनच देत नाहीत. आमच्यासारख्यांना पगारच कसाबसा कापून मिळतोय, त्यामुळे आम्हीही काही बोलू शकत नाही. दैनिकाचा खप या अशा रटाळ संपादकीय लेखांमुळे आणि वास्तवाशी संबंध नसलेल्या लेखांचा भरणा असणार्‍या त्याच-त्याच लेखकांच्या रविवार पुरवणीमुळे घसरत चालला आहे. या सचिनच्या विळख्यातून पुढारी कसा बाहेर पडणार या विवंचनेत आम्ही निमूटपणाने काम करत आहोत.

ता. क.  1) कोरोना जगातून-देशातून कधी हद्दपार  होणार याची जगातील एकालाही कल्पना नसताना, लॉकडाऊन-अनलॉकडाऊनचा खेळ सुरु असताना सचिनरावांनी ‘कोरोनानंतरचे जग’ अशी ‘अर्थपूर्ण’ मालिका चालवून आपल्या बुद्धिमत्तेचे कसब दाखवून दिले आहे. त्याविषयी लोकांमधूनच नव्हे तर अभ्यासकांकडूनही टीका होत आहे.

2) श्रीराम पचिंद्रेंचा करार कोरोनाग्रस्त झाल्यामुळे ते सध्या ‘बाधित’ झाले आहेत. पुढील तीन-चार महिने साहेबांच्या ‘गौरवग्रंथा’चे काम करुन ते निवृत्ताश्रमाला जातील. 

Post a Comment

0 Comments