मुंबई - कोरोनाच्या संकटामुळे एकीकडे अनेक चॅनलनी कॉस्ट कटिंग सुरु केलेली असताना, लोकशाही चॅनलने अनेक दिग्गजसह नव्या दमाच्या तरुणांना संधी दिली आहे. विजय शेखर आणि राहुल पहूरकर ही जोडगोळी गेल्यानंतर कार्यकारी संपादक नितीन भालेराव यांनी लोकशाही चॅनलला नवे रूप दिले आहे.
झी २४ तास मधून बाहेर पडलेले संदीप साखरे, अँकर भूषण करंदीकर, नरेंद्र कोठेकर यांच्यासह अनेक दिग्गज पत्रकारांनी लोकशाही जॉईन केले आहे. तसेच टीव्ही ९ मधील काही जण जॉईन झाले आहेत.
लोकशाही चॅनल डिश, एअरटेल आदी डीटीएचवर दिसत असून, लवकरच टाटा स्काय वर दिसणार आहे. महत्वाचे म्हणजे सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन १ ते ३ तारखेला जमा होत आहे. तसेच स्ट्रींजर रिपोर्टरला त्यांचे मानधन १० ते १५ तारखेला जमा होत आहे. सर्व टीम उत्सहाने कामाला लागली आहे. त्यामुळे हे चॅनल येत्या काही दिवसात स्पर्धेत आल्यास नवल वाटू नये.
0 टिप्पण्या