न्यूज १८ लोकमतच्या तीन प्रमुख हेडला नारळ



मुंबई - न्यूज १८ लोकमतचे  इनपुट , आऊटपूट, प्रॉडक्शन  हेडला एकाच वेळी  नारळ देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे.  चॅनलचा टीआरपी दिवसेंदिवस घसरत असल्याने त्याचे खापर या तिघांवर फोडण्यात आले आहे.


 पूर्वीचे आयबीएन - लोकमत आणि आताचे न्यूज १८ लोकमत मध्ये गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत आलेले रणधीर कांबळे ( इनपुट हेड ), बशीर जमादार ( आऊटपूट हेड ), समीर  चवरकर ( प्रॉडक्शन हेड ) यांना एकाच वेळी नारळ देण्यात आला आहे.

निखिल वागळे गेल्यापासून न्यूज १८ लोकमत मध्ये दर एक - दोन वर्षाला नवीन संपादक, कार्यकारी संपादक  येतो आणि चॅनलची वाट लावून जातो. नवीन कार्यकारी संपादक सुद्धा चॅनलचे जय महाराष्ट्र करणार का ? अशी चर्चा सुरु झाली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या