नागपूर - दैनिक लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक गजानन जानभोर यांनी राजीनामा दिला आहे. प्रकृती अस्वस्थपणामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे.
जानभोर गेल्या २५ वर्षापासून लोकमत मध्ये कार्यरत होते. जिल्हा प्रतिनिधी ते निवासी संपादक असा त्यांचा प्रवास झाला. अकोला आवृत्तीचे प्रमुख म्हणून काम केल्यानंतर नऊ वर्षांपूर्वी नागपुरात आले होते.
एक शांत व्यक्तिमत्व म्हणून त्यांची प्रतिमा होती, सर्वाना सोबत घेऊन काम करणारे जानभोर यांनी लोकमतचा राजीनामा दिला आहे. त्यांना मधुमेहचा त्रास असल्याने प्रकृती अस्वस्थपणामुळे त्यांनी राजीनामा देऊन आराम करणे पसंद केले आहे.
कोरोना संकटमुळे लोकमतमध्ये कॉस्ट कटिंग सुरु आहे. त्यात जानभोर राजीनामा दिल्याने त्यांना लोकमत मधून काढण्यात आले का ? अशी शंका व्यक्त केली जात आहे.
0 Comments