पद्मश्रींच्या कोरोनाने अनेकांना तात्पुरते जीवदान !



कोल्हापूर : कोल्हापुरातून प्रकाशित होणार्‍या एका साखळी दैनिकाचे मालक ‘पद्मश्री’ यांना कोरोना विषाणूची बाधा झाली असून, पुण्यातील उपचारानंतर ते आता कोल्हापुरात परतले आहेत. सद्या तरी पद्मश्री व त्यांचे कुटुंबीय क्वारंटाईन आहेत.

कोरोना विषाणूच्या प्रकोपानंतर केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर देशभरात मोठी आर्थिक मंदी निर्माण झाली आहे. परिणामी, मोठ्या दैनिकांचा आर्थिक गाडा घसरला असून, त्यांनी कॉस्ट कटिंग सुरु केली होती. कारण, कॉर्पोरेट बिझनेस कमी झाला असून, 2022 पर्यंत हा बिझनेस पूर्वीइतका होणार नाही, असे संकेत सर्वच दैनिकांच्या व्यवस्थापनाला मिळाले आहेत. त्यामुळे व्यवस्थापन व मालकांनी खर्च कमी करत कर्मचारीही कमी केले आहेत. तसेच, तोट्यातील एडिशन गुंडाळल्या गेल्यात.

पद्मश्रींच्या दैनिकातही ज्यांचा परफॉर्मन्स काहीच नाही, अशा तोट्यातील एडिशनमधील अनेकांवर गंडांतर आले आहे. त्यांची यादीही व्यवस्थापनाने तयार केली असून, पद्मश्रींच्या अंतिम आदेशानंतर अमलबजावणी होणार आहे. पद्मश्रींच्या सोलापूर एडिशनमधील दोन वरिष्ठांसह नगरचा निवासी संपादक, पुण्यातील दोघे आणि इतरही काही जणांचा या यादीत समावेश असल्याची माहिती हाती आली आहे.

नगरच्या निवासी संपादकाने नोकरी मिळविताना पद्मश्रींना मोठमोठ्या बाता मारल्या होत्या. याच बातांच्या जोरावर गलेलठ्ठ पगार व निवासी संपादक हे पद प्राप्त करून घेतले होते. परंतु, वर्ष-दीड  वर्षभरात या महोदयांना त्यातील एकाही आश्‍वासनाची पूर्तता त्याला करता आली नाही, त्यामुळे महिनाभरापूर्वीच त्यांना अगदी कोल्हापुरी भाषेत पद्मश्रींनी समज देत घरचा रस्ता दाखवील, असे बजावले होते. त्याने तीन महिन्याची मुदतवाढ घेऊनही काहीच सुधारणा न केल्याने त्याला घरचा रस्ता दाखवला जाणे क्रमप्राप्त आहे.


यासह पुण्यातील दोघे वरिष्ठही पद्मश्रींच्या रडारवर आले आहेत. कोराना झाल्यामुळे पद्मश्रींसह त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने पुण्यात हलविण्यात आले होते. त्यामुळे या सर्वांना तूर्त जीवदान मिळाले होते. लवकरच पद्मश्री पुन्हा ऑफिसला जाण्याची शक्यता असून, या जीवदान मिळालेल्यांचा फैसला होणार असल्याचेही पद्मश्रींच्या निकटवर्तीयांनी सांगितले. त्यामुळे नारळ मिळण्याची शक्यता असलेल्या सर्वांचा जीव आता टांगणीला लागलेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या