मानबिंदूला कुणी संपादक मिळेल का संपादक ?


नागपूर - महाराष्ट्राचा मानबिंदू म्हणून बिरुद लावणाऱ्या  दैनिक लोकमतच्या होम आवृत्तीमध्ये  कार्यकारी संपादक आणि निवासी संपादक पद भरणे  आहे. त्यासाठी लोकमतमध्येच  जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. लोकमतचे अनेक ज्येष्ठ पत्रकार या पदासाठी इच्छूक असताना बाबूजींनी चक्क जाहिरात प्रसिद्ध केल्याने अनेकांच्या  भुवया उंचावल्या आहेत.


ज्येष्ठ साहित्यिक  सुरेश द्वादशीवार यांनी सहा महिन्यापूर्वी संपादक पदाचा राजीनामा दिला होता. ३१ जुलै रोजी निवासी संपादक जानभोर यांनीही लोकमतला बाय - बाय केले. त्यामुळे या दोन्ही  जागा रिक्त आहेत. लोकमत नागपूरचे कार्यकारी संपादक पद आपल्याला मिळावे यासाठी लोकमतचेच अनेक ज्येष्ठ पत्रकार प्रयत्न करीत आहे. त्यात मुंबईचे यदु जोशी, दिल्लीचे विकास झाडे व अकोलाचे रवी टाले यांनी फिल्डिंग लावली आहे.झाडे यांनी नागपूरला बदली द्या यासाठी दर्डा यांना पत्र पाठविल्याची चर्चाही जोरात आहे.

इनहाऊस मधून चांगला उमेदवार मिळाला  नाही तर बाहेरील कोण चांगला राहील ? यावर मॅनेजमेंट चाचपणी करीत आहे. कार्यकारी संपादक पदासाठी  सकाळचे शैलेश पांडे, लोकशाही वार्ताचे संपादक भास्कर लोंढे  आदी नावाची चर्चा सुरु आहे. निवासी संपाद्क पदासाठी पुण्य नगरीचे रघुनाथ पांडे प्रयत्नशील आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या