कोल्हापुरातून प्रसिद्ध होणार्या साखळी वृत्तपत्राचे संपादक, पद्मश्री यांना कोरोना झाला होता. त्याचवेळी ‘दादाश्रीं’नाही कोरोनाने गाठले होते. हे दोघेही कोल्हापुरात नसताना कार्यालयात एक नाजूक प्रकरण घडले. त्यातून लफडेबाज आयटी मॅनेजरला कार्यालयात येऊन त्या पोरीच्या नवर्याने, भावाने चांगलेच ठोकून काढले. आयटी विभागातील आपल्या सहकारी महिलेला पन्हाळ्याला लॉजवर घेऊन जाणे या मॅनेजरला महागात पडले.
मात्र एवढा सगळा भंडाफोड झालेला असताना पद्मश्रींच्या वृत्तपत्राचे जीएम आणि बेळगावचा कुंदा आणून पद्मश्रींच्या वृत्तपत्रावर एकेकाळी कुरघोडी करु पाहणारा मात्र सध्या पद्मश्रीचे पाय चाटणारा मांडवरुपी असिस्टंट जनरल मॅनेजर यांनी या लफडेबाज प्रकरणावर पांघरून घातले. ही भयानक बाब त्यांनी पद्मश्री किंवा दादाश्री यांच्या कानावर घातलीच नाही. तेरी भी चूप, आणि मेरी भी चूप असे हे प्रकरण सध्या कोल्हापुरात गाजत आहे.
पद्मश्रीच्या कार्यालयात कुठे खुट्ट झाले तरी त्याची माहिती मोठ्या साहेबांच्या कानावर जाते. ज्या त्या ठिकाणी साहेबांनी अशीच खास माणसे पेरलेली आहेत. त्यामुळे भल्याभल्यांची गाळण उडते, थरकाप उठतो. मात्र साहेब आणि दादाश्री यांना झालेला कोरोना संसर्गाचा फायदा उठवून त्यांच्यापासून हे प्रकरण दडवून ठेवण्यात आले आहे. एखाद्या वार्ताहराने जाहिरातीची थकबाकी बुडविली तर त्याला साम, दाम दंड या नीतीचा अवलंब करून सळोकी पळो करून सोडण्यात येते. मात्र आयटीचा मॅनेजर सहकारी महिलेला चक्क पन्हाळ्याला लॉजवर घेऊन जातो, तिचा नवरा त्यांचे लपून छपून फोटो काढतो, नवरा-बायकोचे त्यातून भांडणे होते व संसार तुटतो, आणि बायकोला गाडीवर बसवून सासरी सोडून येतो. इतके रामायण घडून, दुसर्या दिवशी या आयटी मॅनेजरची मुख्य कार्यालयात जाऊन धुलाईदेखील करतो.
या मॅनेजरने आपल्या विभागात चार पोरी भरल्या तेव्हाच तो सर्वांच्या डोळ्यावर आला होता. त्यातील एकीबरोबर त्याचे सूत जुळले. दालनात, ऑफिसच्या बाहेर, भाऊसिंगजी रोडवर, ऑफिसच्यासमोर बोळात हा ‘पती, पत्नी और वह! असा तीर मारणारा विजयरुपी मॅनेजर, सातत्याने या पोरीशी लगट करायचा. हे सगळ्यांना माहीत होते, मात्र मात्र सर्वजण नजरेआड करीत होते. त्यात पद्मश्रीना आणि दादाश्रीना कोरोना झाल्याने आणि ते ऑफिसमध्ये नसल्याने या मॅनेजरचे चांगलेच फावले. नेमकी संधी साधून त्याने पन्हाळ्यातील लॉज गाठलेच. मात्र व्हायचा तो भंडाफोड झालाच.
धक्कादायक बाब अशी, की या लफडेबाज आयटी मॅनेजरला चक्क जीएम आणि एजीएमने पाठीशी घालून या प्रकरणाची खबर पद्मश्री किंवा दादाश्रींना लागणार नाही, याची काळजी घेतली. त्यामुळे आता बेरक्याच्या माध्यमातून ही घटना पद्मश्रींना कळल्यावर ते या लफडेबाज मॅनेजरचा समाचार घेतात का, ते पाहणे औत्स्तुक्याचे ठरणार आहे.
0 टिप्पण्या