मुंबईत पत्रकारात राडा, रिपब्लिक चॅनेलच्या रिपोर्टरच्या कानशिलात लगावली !


मुंबई - मुंबईत आज पत्रकारात  मोठा राडा झाला. मुंबईकर मराठी पत्रकारांना चहा -बिस्कीट  खाणारे गरीब पत्रकार  असे अपमानास्पद शब्द काढताच दोन मराठी पत्रकारांनी रिपब्लिक चॅनेलचा रिपोर्टर  प्रदीप भंडारीच्या कानशिलात लगावली. त्याचे महाराष्ट्रातील अनेक  पत्रकारांनी समर्थन केले आहे. 


NCB आँफिस समोर कव्हरेज करताना रिपब्लिक चँनलचे रिपोर्टर  दररोज आरडा -ओरडा करून कव्हरेज करत असतात. त्यामुळे इतर चँनलच्या पत्रकारांना लाईव्ह कव्हरेज करताना अनेकदा अडचणी येतात. त्यातच आज लाइव्ह कव्हरेज सुरू असताना रिपब्लिक चँनलच्या पत्रकारांनी मुंबईकर मराठी पत्रकारांना चहा -बिस्कीट  खाणारे गरीब पत्रकार  म्हणून हिनवले. त्यामुळे  दोन मराठी  पत्रकारांनी रिपब्लिक चॅनेलचा रिपोर्टर  प्रदीप भंडारीच्या कानशिलात लगावली. त्याची व्हिडिओ  क्लिप सोशल मीडियावर फिरत आहे. 

व्हिडीओ पाहाप्रदीप भंडारीवर अदखल पात्र गुन्हा दाखल 

शिवीगाळ करून धमकी देणे तसेच अपशब्द बोलल्याप्रकरणी रिपब्लिक चॅनलचा रिपोर्टर  प्रदीप  भंडारीवर कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टीव्ही जर्नालिस्ट असोशिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. 
टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या