पत्रकार पांडुरंग रायकर हे श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी येथील सामान्य कुटुंबातील होते. कुटुंबात कुणीही सुशिक्षित नसल्याने शिक्षणाचा ध्यास घेत अत्यंत हालाकीची परीस्थिती असताना कठीण परीस्थितीत शिक्षण पुर्ण केले.
२००४ ते २००५ साली रानडे इन्ट्युटुट येथे पत्रकारीतेची पदवी घेतली होती. त्याकाळातच त्यांनी (लॉ) कायद्याची पदवी धारण केली. २००६ ते २००७ साली पुणे येथे दै. केसरी या वर्तमान पत्रातुन पत्रकारीतेचा श्रीगणेशा केला. २००७ ते २००८ दै. सामना येथे काम केले. २००८ ते २०१२ साली हैद्राबाद येथे ETv मराठी या वृत्तवाहीनीचे प्रतिनिधीत्व केल त्यानंतर दै. तरुण भारत, दै.पुण्य नगरी मुंबई येथे उपसंपादक म्हणून काम पाहीले त्यानंतर मुंबईत ABP माझा या वृत्तवाहीत रुजु झाले. २०१४ साली यांची अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी म्हणुन नियुक्ती झाली. चार वर्ष त्यांनी अहमदनगर जिल्ह्यात ABP माझाचे प्रतिनिधीत्व केले. २०१८ साली ते पुणे येथील Tv9 मराठी या वृत्तवाहीनीत वरीष्ठ पत्रकार म्हणुन काम पहात होते. आज दिनांक २/९/२०२० रोजी पहाटे ५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या मागे पत्नी, आई, वडील, एक मुलगा एक मुलगी व तीन बहीणी असा मोठा परीवार आहे.
अत्यंत हसतमुख व प्रतेकाच्या मनात घर करुन राहणारे सर आज आपल्यात राहीले नाही. पत्रकारीतेच्या क्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे.
नेमकं काय घडलं?
➤पांडुरंग रायकर यांना 20 ऑगस्टला थंडी आणि तापाचा त्रास, त्यानंतर डॉक्टरांकडे जाऊन उपचार.
➤पांडुरंग रायकर यांची 27 ऑगस्टला कोरोना चाचणी, मात्र अहवाल निगेटिव्ह
➤दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 ऑगस्टला पांडुरंग रायकर अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या गावी गेले.
गावी गेल्यावरही त्रास झाल्यामुळे कोपरगावमधे अँटीजेन टेस्ट, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह
रविवार 30 ऑगस्टला रात्री त्यांना अँब्युलन्समधून उपचारांसाठी पुण्यात आणलं, पुण्यातील पत्रकारांनी त्यांच्या नातेवाईकांच्या संमतीने रायकर यांना जंबो हॉस्पिटलमधे भरती केलं.
➤जम्बो हॉस्पिटलमधे त्यांच्यावर आयसीयूमधे उपचार सुरु होते, मात्र त्यांची परिस्थिती खालावत होती
➤रायकर यांना खाजगी हॉस्पिटलमधे दाखल करण्याचे प्रयत्न पुण्यातील पत्रकारांनी सुरु केले
➤काल (मंगळवार 1 सप्टेंबर) त्यांची ऑक्सिजन पातळी 78 पर्यंत खाली गेली.
➤जम्बो हॉस्पिटलमधून अन्यत्र नेण्यासाठी कार्डिॲक अँब्युलन्सची गरज होती.
➤रुग्णवाहिका मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. मंगळवारी रात्री एक अँब्युलन्स जम्बो हॉस्पिटलला पोहचली, पण त्यामधील व्हेंटीलेटर खराब झाल्याचं सांगितलं गेलं.
➤दुसरी अँब्युलन्स मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु होते, पण त्यात डॉक्टर उपलब्ध नव्हते. तोपर्यंत रात्रीचे बारा-सव्वाबारा वाजले होते.
➤पहाटे चार वाजता अँब्युलन्स मिळवण्याचा प्रयत्न पुन्हा सुरु झाला पण तोपर्यंत पांडुरंगची प्रकृती आणखी खालावली होती.
➤दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून पहाटे पाच वाजता अँब्युलन्स उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं आणि आयसीयूमधील डॉक्टरांचा ‘आम्ही निघत आहोत’ असा फोन आला.
➤पांडुरंगचे मित्र असलेले पत्रकार आणि नातेवाईक जम्बो हॉस्पिटलला पोहचले आणि डॉक्टरांनी साडेपाच वाजता त्यांचं निधन झाल्याचं सांगितलं.
➤कार्डिॲक अँब्युलन्स जम्बो हॉस्पिटलला पोहचली पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.
- संजयकुमार पाठक
अहमदनगर
0 टिप्पण्या