तुळजाभवानी बातमी प्रकरणी दिव्य मराठीकडून दिलगिरी व्यक्त

तुळजापूर - महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे मंदिर कोरोना महामारीमुळे गेले सहा महिने झाले बंद आहे, मात्र दररोज प्रथेप्रमाणे पूजाअर्चा सुरु आहे.त्यामुळेच यंदा शारदीय नवरात्र महोत्सव देखील  भक्ताविना पार पडला. 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच सेवेकरी, पुजारी  आणि मानकऱ्यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. २६) पहाटे कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघन सोहळा उत्साहात मात्र साधेपणाने पार पडला. यावेळी कुंकवासोबतच फुलांची मुक्त हस्ते उधळण करण्यात आली. सीमोल्लंघन सोहळ्यानंतर तुळजाभवानी माता श्रमानिद्रेसाठी नगरच्या पलंगावर विसावली असून, आता  ५ दिवसांच्या श्रमनिद्रेनंतर शनिवारी (दि. ३१) पहाटे अश्विन पौर्णिमेदिनी तुळजाभवानी माता सिंहासनावर विराजमान होईल.


https://epaperdivyamarathi.bhaskar.com/solapur/osmanabad-jillap/400/27102020/0/0/

असे असताना दिव्य मराठीने या बातमीने  हेडिंग 'कुंकूवात न्हाली, श्रमली-दमली तुळजाभवानी, निद्रा सुरू; आता पाच दिवसांसाठी ‘क्वाॅरंटाइन’' असे दिले. तुळजाभवानी  माता पाच दिवसांसाठी ‘क्वाॅरंटाइन’ म्हटल्यामुळे भाविक भक्त,  सेवेकरी, पुजारी आणि मानकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. अनेकांनी दिव्य मराठीचा निषेध केला. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेवून  गुन्हा दाखल करण्याची तंबी दिव्य मराठीला दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी निवासी संपादकांने दिव्य मराठीच्या अंकात दिलगिरी व्यक्त केली आहे. 


https://epaperdivyamarathi.bhaskar.com/solapur/osmanabad-jillap/400/28102020/0/0/

मुळात ही  बातमी लिहिणारा स्थानिक वार्ताहर प्रदीप अमृतराव याने बातमी पाठवताना ‘क्वाॅरंटाइन’  शब्द लिहिला नव्हता. जिल्हा कार्यालयात डेक्सवर बसणाऱ्या ब्युरोने तिखट मिर्ची  लावण्याच्या नादात बातमीत फेरफार केला. त्यामुळे स्थानिक वार्ताहरास मानसिक त्रास सहन करावा लागला. तसेच भाविक भक्त, पुजारी, सेवेकरी आणि संपूर्ण तुळजापूरकर दुखावले. अनेकांनी दिव्य मराठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 


दिव्य मराठीच्या जिल्हा कार्यालयात  डेक्सवर बसणाऱ्या  काही माणसामुळे दिव्य प्रताप घडत आहेत. दिव्य मराठी प्रशासन ‘क्वाॅरंटाइन’  लिहिणाऱ्यास काही दिवस तरी ‘क्वाॅरंटाइन’  करणार का ? याकडे लक्ष वेधले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या