लोकमत सखी मंचवर आरती तोष्णीवाल यांचे उडान !

पिंपरी चिंचवड मध्ये संगीता तरडे यांचा आवाज घुमला !!



पुणे -  लोकमत सखी मंचच्या पुणे शहर संयोजिका आरती  तोष्णीवाल आणि  पिंपरी चिंचवडच्या संयोजिका संगीता तरडे यांनी लोकमत सखी मंचचा राजीनामा देवून स्वतःचे व्यासपीठ सुरु केले आहे. आरती तोष्णीवाल यांनी उडान तर संगीता तरडे  यांनी  आपला आवाज आपली सखी  व्यासपीठ सुरु केले आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये लोकमत सखी मंच कोलमडला असून, लोकमतला या प्रकरणी दैनिकात खुलासा करण्याची नामुष्की ओढवली आहे. 


महाराष्ट्राचा मानबिंदू म्हणून बिरुद मिरवणाऱ्या आणि राज्यात मराठी दैनिकात नंबर १ असल्याचा दावा करणाऱ्या लोकमतने गेल्या अनेक वर्षांपासून महिलांसाठी लोकमत सखी मंच  सुरु केला आहे. मात्र गेली अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या सखी मंचच्या संयोजिका अंतर्गत राजकारणाला कंटाळून बाहेर पडून स्वतःचे व्यासपीठ स्थापन करीत आहेत. त्यामुळे लोकमतचा सखी मंच दिवसेंदिवस खिळखिळा होत आहे. 


पिंपरी चिंचवड मधील संयोजिका संगीता तरडे यांनी एक वर्षांपूर्वी लोकमतच्या स्थानिक व्यवस्थापकाच्या मनमानी कारभार आणि छळाला  कंटाळून बाहेर पडून आपला  आवाज आपली सखी नावाचे व्यासपीठ सुरु केले होते. या व्यासपीठाचे जवळपास दहा हजार सभासद झाले असून, विविध कार्यक्रमामुळे त्याच्याकडे महिला आकृष्ट होत आहे. त्याची पोटदुखी स्थानिक व्यवस्थापकाला होत असून, तरडे यांची बदनामी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. 


पुणे सखी मंचच्या संयोजिका आरती तोष्णीवाल आणि सोलापूर सखी मंचच्या ईशा वनेरकर यांनी सखी मंचमधून बाहेर पडून दोघानीं एकत्र येऊन उडान  व्यासपीठ सुरु केले आहे. उडान च्या पुणे  कार्यालयाचे ज्या दिवशी उद्घाटन होते त्याच दिवशी ( १५ ऑक्टोबर ) लोकमत मध्ये एक बातमी झळकली. त्यात म्हटले आहे की , फसव्या व्यक्ती आणि संस्थांपासून सावधान राहा.  लोकमतच्याच काही माजी कर्मचाऱ्यांनी लोकमत सखी मंचच्या धर्तीवर छोटे क्लब सुरु करण्याचा प्रयत्न केला आहे. सखीचा विश्वासघात करून खोटी आश्वासने देत आहेत. या जाहिरातींना भुलू नये असे म्हटले आहे. 


लोकमतसारख्या मोठ्या मीडिया ग्रुपला एखाद्या सखीने स्वतःचे व्यासपीठ स्थापन केले तर पोटदुखी का व्हावी ? याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 


पुणे शहरात  उडान  व्यासपीठ आणि पिंपरी चिंचवडमध्ये  आवाज आपली सखी  व्यासपीठ मध्ये लोकमत सखी मंच  मधील अनेक महिला सहभागी होत असल्याने लोकमतच्या स्थानिक व्यवस्थापकांची पोटदुखी वाढली असून, उडान  आणि आपला आवाज आपली सखीची बदनामी करण्याची मोहीम हाती घेतली जात आहे. त्याला महिलानी बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या