मुंबई - ई -टीव्ही भारतने अनेक रिपोर्ट्सना आता स्ट्रिंजर करण्याचे ठरवले आहे. कोरोनाचा कॉस्ट कटिंग इफेक्ट् की चुकलेली डिजिटल पॉलिसी, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद वगळता इतर ठिकाणी असलेल्या जिल्हा रिपोर्टर/कंटेंट एडिटर पोस्टवरील अनेकांना आता स्ट्रिंजर्स म्हणून काम करावे असा फतवा HR ने काढला असून या सर्व जणांना राजीनामे पाठवा असे फर्मावले आहे.
राजीनामा पाठवल्यानंतर या सर्वांना स्ट्रिंजर पोस्टवर नव्याने नियुक्ती देण्यात येणार असून कंपनीने आपल्या लायबलिटीतून मुक्तता करून घेण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे महिन्याकाठी ज्या प्रतिनिधीला 20 ते तीस हजार रुपये मिळत होते त्यांना आता पाच सात हजारात काम करावे लागेल अशो शक्यता आहे..
0 टिप्पण्या