फेक बातम्या देणारा एबीपी माझाचा राहुल कुलकर्णी पुन्हा तोंडावर पडला


भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची मागितली माफी 




औरंगाबाद -  फेक बातम्या देण्यात माहीर असलेला एबीपी माझाचा उस्मानाबाद रिपोर्टर राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा तोंडावर पडला आहे. भाजपच्या  नेत्या पंकजा मुंडे  यांची माफी मागण्याची वेळ कुलकर्णीवर आली आहे. पण ही माफी चॅनलवर न मागता ट्यूटरवर मागितली आहे. माफी मागताना स्वतःची चूक हिंगोली रिपोर्टरवर ढकलली आहे. 


दुसऱ्याच्या बातम्या स्वतःच्या नावावर खपवणाऱ्या राहुल कुलकर्णी याने भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे  यांनी न दिलेले स्टेटमेंट प्रसारित केले होते. मुघल परवडले मात्र महाविकस आघाडी सरकार परवडत नाही, अशी टीका भाजप नेते पंकजा मुंडे यांनी हिंगोलीत केली आहे अशी फेक बातमी त्याने दिली  होती. ही  बातमी पाहून  पंकजाताई  संतप्त झाल्या. अश्या प्रकारचे स्टेटमेंट मी दिलेले नाही, मी कधीही असे बोलले नाही. एबीपी माझाने  तात्काळ माफी मागावी आणि ही  बातमी वापस घ्यावी, हे अत्यंत अयोग्य आहे आणि हे वारंवार होण्याबाबत मला खंत वाटते, असे ट्युट पंकजा मुंडे यांनी केले होते. सोबत एबीपी माझाच्या बातमीचे स्क्रीन शॉट पोस्ट केला होता. 


त्यावर राहुल कुलकर्णी याने खुलासा केला आहे. झालेला प्रकार आमच्या हिंगोली प्रतिनिधीने दिलेल्या चुकीच्या बातमीमुळे झाला. ही आमची जबाबदारी आहे, त्या बद्दल दिलगीर आहे.झालेल्या चुकीबद्दल योग्य ती कारवाई  करण्यात आली आहे, असे रिटयुट कुलकर्णी याने केले आहे. 



राहुल कुलकर्णीने पंकजा मुंडे यांची माफी  ट्विटरवरून मागितली, ही बातमी चुकीची होती हे टीव्हीवर दाखवणार का की केवळ टीवटीव करून माफी मागणार? असा सवाल पंकजा मुंडे यांचे समर्थक करीत आहेत. 


राहुल कुलकर्णी याने आजवर अनेक फेक बातम्या दिल्या आहेत. बातमी अंगलट आली की दुसऱ्यावर ढकलून हा मोकळा होतो.  ही  बातमी देण्यापूर्वी पंकजा मुंडे यांच्याशी संपर्क साधला होता का ? त्यांचे लाइव्ह स्टेटमेंट घेतले होते का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. संपादक राजीव खांडेकर किती दिवस राहुल कुलकर्णी यास पाठीशी घालणार ? असा सवाल अनेकजण करीत आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या