लोकशाहीमध्ये एचआरची ठोकशाही, गळती सुरू...
मुंबई - लोकशाही चॅनलमध्ये गेल्या काही दिवसापासून गळती सुरु झाली असून, अवघ्या एक ते दोन महिन्यात अनेक नामवंत अँकर, प्रोड्युसर यांनी राजीनामा दिला आहे. लोकशाहीमध्ये एचआरची ठोकशाही सुरु असल्याने ही  गळती सुरु आहे. टीव्ही चॅनलमधील जबरदस्त आवाज असणारा नामवंत न्यूज अँकर भूषण करंदीकर, आरती कुलकर्णी, अजित भातंब्रेकर यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. तर संदीप साखरे आणि नरेंद्र कोठेकर यांनी काही दिवसापूर्वी केवळ आठ दिवसात राजीनामा दिला आहे. 


संपादक नितीन भालेराव यांनी काही दिवसापूर्वी राजीनामा दिला होता पण त्यांनी परत घेतला आहे. विशाल पाटील कसेबसे दिवस काढत आहेत.  नवीन किती तरी तरुण मुले - मुली येतात आणि आणि केवळ एक -दोन महिन्यात राजीनामा देवून  निघून जातात.  या चॅनलमध्ये फार - फार तर एक किंवा दोन महिने कुणीही टिकत नसल्याने या चॅनलचे भवितव्य अंधकारमय दिसत आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार या चॅनलची एच.आर महिला कर्मचाऱ्यांना तंग  करीत असल्याने अनेकजण वैतागले आहेत. सलग तीन दिवस पाच महिने उशीर केला तर एक दिवसाचे वेतन कपात, डेक्सवर कुणीही जेवणाचा डबा  खायचा नाही. केवळ १५ मिनिटे ब्रेक फास्टसाठी सुट्टी आदी कडक नियमामुळे कर्मचारी वैतागत आहेत. सर्व चॅनल्स मध्ये आठ तास ड्युटी असताना लोकशाही मध्ये ९ तास ड्युटी आहे. तसेच आजारी असताना सुट्टी घेतली तर वेतन कपात केले जाते. एचआरच्या मनमानीपणाला कंटाळून कर्मचारी चॅनलला रामराम ठोकत आहेत


त्याचबरोबर मॉर्निग शिप्ट तसेच नाईट शिफ्ट मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱयांना चॅनलकडून  पिकअप ड्रॉप ( प्रवास वाहन )  मिळत नसल्याने अनेकजण वैतागून राजीनामा देणे पसंत करीत आहेत. चॅनलमध्ये खेळीमेळीचे वातावरण नसल्याने कोणत्याही कर्मचाऱ्यांचे कामावर मन लागत नसल्याचे अनेकांनी सांगितले. Post a Comment

0 Comments