मुंबई - रिपब्लिक टीव्ही नेटवर्क लवकरच मराठी चॅनल सुरु करणार आहे. त्याची जोरदार तयारी सुरु आहे. पुढील महिन्यात डिजिटल मराठी चॅनल सुरु होणार असून, त्याकरिता कॉपी रायटर आणि न्यूज रायटरच्या जागा निघाल्या आहेत.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस व रायगड पोलिसांनी संयुक्त कारवाई करून अर्णब गोस्वामी यांना अटक केली होती. याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने जामीन दिल्यानंतर कारागृहाबाहेर आलेल्या अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुले आव्हान दिले होते. 'उद्धव ठाकरे, ऐका माझं. तुमचा पराभव झालाय, खेळ आता सुरु झालाय' असे म्हणत प्रत्येक भाषेत रिपब्लिक टीव्ही सुरू करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली होती.
त्यानुसार रिपब्लिक टीव्ही नेटवर्क सर्वप्रथम मराठी आणि बंगाली न्यूज चॅनल सुरु करणार असल्याची माहिती मिळाली आहे. कॉपी रायटर आणि न्यूज रायटरच्या जागा या मराठी चॅनल करीता असल्याचे सांगण्यात आले.
0 टिप्पण्या