नाशिक मधील पत्रकार त्रिकुटाचे थेट पोलीस अधिकाऱ्यांना पार्टीचे आमंत्रण


नाशिक - नाशिक शहरात सध्या पोलीसांना पार्टीचे आमंत्रण देण्याचा विषय शहरातील 13 पोलीस ठाण्यात चांगलाच चर्चेला आला आहे. विशेष म्हणजे नव्याने चार्ज घेतलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाच एका फार्म हाऊसवर रंगत दार पार्टीचे आमंत्रण दिल्याचं पत्रकारिता क्षेत्रात जोरदार चर्चा आहे.


आता हे पत्रकारांचं त्रिकुट कोण असा प्रश्न निर्माण झाल्यावर हे महाशय स्वतःला हुशार पत्रकार समजत असून यातील 2 जण रिजनल चॅनेलचे आहे तर 1 जण स्थानिक वृत्तवाहिनीचा मालक असून तो सुद्धा एका रिजनल चॅनेलाचा प्रतिनिधी आहे. 


या तिघांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन शहरातल्या पत्रकारांच्या ग्रुपमध्ये फालतू पत्रकार असल्याचा सांगत स्वतः एकदम हुशार आणि अनुभवी पत्रकार असल्याचा आव या पोलीस अधिकाऱ्यांसमोर आणल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.


पोलीस आणि पत्रकार मित्रांच्या व्हाट्स अप ग्रुप मध्ये यु ट्यूब लिंक आणि फेसबुक पत्रकार असल्याची खोटी माहिती या तिघांनी दिली असून रिजनल चॅनेलच्या पत्रकारांचा वेगळा ग्रुप तयार करू असे आश्वासन देखील या हुशार त्रिकुटाने दिली आहे.


ज्या ठिकणी स्नेह भोजनाच्या नावाखाली पार्टीचे आमंत्रण देण्यात आले आहे तो फार्म हाउस देखील चॅनेलमधील एकाच्या मालकीचा असल्याचा खुलासा समोर आला आहे.


एकूणच या त्रिकुटाने शहरात वसुलीचा धडाका लावला असून त्यासाठी खास एका ऑनलाइन पोर्टलला काम करणाऱ्या प्रतिनिधीची मदत घेतली जात आहे. त्यालाही त्याची टक्केवारी मिळत असल्याने तो सुद्धा खुश आहे.


हे त्रिकुट नेमके होणं आहे, याची चवीने चर्चा केली जात आहे. 

Post a Comment

0 Comments