निलेश खरे अखेर झी २४ तास मध्ये जॉईन

आशिष जाधव यांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारला 



मुंबई - निलेश खरे आज झी २४ तास मध्ये दिल्ली ऑफिसमध्ये जॉईन झाले. त्यांच्याकडे मुख्य संपादक, डिजिटल प्रमुख आणि बिझिनेस हेड म्हणून जबाबादारी देण्यात आली आहे.दुसरीकडे आशिष जाधव यांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला असताना,त्यांना हुतात्मा करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 


सामचा राजीनामा दिल्यानंतर निलेश खरे नेमके कुठे जाणार ? याबाबत औत्सुक्य होते. कुणी म्हणत होते न्यूज १८ लोकमत, कुणी लोकशाही तर कुणी टीव्ही ९ मराठी अशी अफवा उठवली होती. पण बेरक्याकडे पक्की माहिती होती. 


खरे आज दिल्ली ऑफिस मध्ये जॉईन झाले. येथून पाच दिवस झी २४ तास सिस्टीम बद्दल त्यांची ट्रेनिंग चालेल. सहा तारखेला ते मुंबईत जॉईन होतील. त्यांच्याकडे झी २४ तासचे मुख्य संपादक, डिजिटल प्रमुख आणि बिझिनेस हेड, ऍडमिन अशी संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. ते झी २४ तासचे होल  ऍण्ड सोल झाले आहेत. 


आशिष जाधव यांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारला 


खरं तर निलेश खरे यांच्याकडे झी २४ तासचे बिझिनेस हेड, डिजिटल प्रमुख आणि कन्टेंट हेड  ही  प्रमुख जबाबदारी येणार होती आणि आशिष जाधव यांच्याकडे संपादक म्हणून कायम राहणार होते. जेव्हा आशिष जाधव यांना कळाले  की , खरे झी तास मध्ये येणार आहेत, तेव्हा त्यांनी मालक सुभाषचंद्र गोयल यांच्यावर पॉलिटिकल प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी काही खासदार आणि नेत्यांना मालकास फोन करायला लावले. नेमके त्यादिवशी मालकांचे नातेवाईक आजारी होते. सोबत फॅमिली होती. त्यामुळे मालक जाम  चिडले आणि एचआरला सांगून जाधवांचा १० मिनिटात राजीनामा घ्या असा आदेश दिला. 


झाले एचआरने मालकांचा आदेश मानला आणि आशिष जाधव यांचा तडकाफडकी राजीनामा घेण्यात आला. जाधव यांनी स्वतःहून पायावर धोंडा मारून घेतला. एकतर त्यांच्याबद्दल काही जुन्या अँकरनी  थेट मालकाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यात पॉलिटिकल प्रेशर यामुळे जाधवांची विकेट पडली. 

आशिष जाधवांना काढण्याची कारणे 

१. राजकारण्यांकडून दबाव आणला. त्यामुळे मालक संतापले.

२. टीआरपी आला नाही. वर्षभरापासून झी २४ तास चार नंबरवर राहीले. साम, टिव्ही ९, एबीपी पुढे गेले.

३. रेव्हेन्यू मिळवता आला नाही. कंपनीला मोठे नुकसान झाले.

४. कार्यालयातून ॲंकरनं आणि कर्मचा-यांनी केलेल्या तक्रारी. ॲंकर मधील वाद 

एकीकडे वस्तुस्थिती समजून न घेता, निखिल वागळे सारखे पत्रकार आशिष जाधव यांना  हुतात्मा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या