दैनिक 'जनशक्ती'चे संपादक कुंदन ढाके यांचे निधन




पिंपरी -चिंचवड - दैनिक जनशक्तीचे संपादक व सिद्धिविनायक ग्रुपचे संचालक कुंदन दत्तात्रय ढाके (वय 42 वर्षे) यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाबद्दल अनेकांनी शोक प्रगट  केला आहे. 


 कुंदन  ढाके  हे आज ( सोमवारी ) सकाळी  नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेले असता रस्त्यातच त्यांना चक्कर आली. त्यानंतर काही लोकांनी त्यांना  वायसीएम रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


ढाके  यांनी, जळगांव येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक जनशक्तीचे सर्व मालकी हक्क घेऊन  पिंपरी -चिंचवड, पुणे आणि मुंबई मध्ये सुरु केले होते, परंतु सर्व आवृत्या तोट्यात केल्याने  प्रिंट मधील आवृत्या बंद करून डिजिटल मध्ये जनशक्ती सुरु ठेवले होते. 


बांधकाम व्यवसायात त्यांनी चांगले नाव कमावले होते, पण नोटबंदीनंतर त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते.आर्थिक परिस्थितीतून सावरत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. 


पत्रकार शेखर पाटील यांची पोस्ट 

दैनिक जनशक्तीचे मालक/संपादक कुंदन ढाके यांचे आज पहाटे निधन झाले. वयाची बेचाळीशी  हे काही जाण्याचे वय असते का हो ? या आघाताची माहिती मिळताच काही क्षणांमध्येच भुसावळातील आमच्या बालपणीच्या सर्व रम्य आठवणी डोळ्यासमोर तरळून गेल्या. क्रिकेटच्या मैदानापासून ते धम्माल पंचतारांकीत मस्तीसोबतचे सारे काही आठवून हुंदके येत आहेत. सर्वसाधारण परिस्थिती असणार्‍या शिक्षकाच्या मुलाने स्वकर्तृत्वाने उभारलेले वैभव हे आम्हा सर्व मित्रांना अभिमानास्पद असेच होते. ढाके कुटुंब, आमचा मित्र परिवार, जनशक्ती परिवार आणि इतर स्नेह्यांची यामुळे अपरिमीत हानी झाली आहे. मित्रा तुला चिरशांती लाभो हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना !

- शेखर पाटील, जळगाव/भुसावळ


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या