नवे वर्षे , नवीन इनिंग ...

 




मुंबई - बदल हा निसर्गाचा नियम आहे. नवीन वर्षे सुरु होताच अनेकांनी नवीन इनिंग सुरु केली आहे. मुंबईत चॅनलमध्ये अनेक बदल झाले आहेत. 


👉निलेश खरे यांनी सामचा  राजीनामा दिल्यानंतर सामची सूत्रे कुणाकडे जाणार ? याकडं लक्ष वेधलं होतं. वृत्तसंपादक राजेंद्र हुंजे यांच्याकडे सध्या सूत्रे देण्यात आली आली असून, संपादकाचा शोध सुरु आहे. 


👉सामचा स्टार अँकर अनिकेत पेंडसे याने  टीव्ही ९ मराठी जॉईन करताच त्याच्यापेक्षा स्टार असलेल्या भूषण करंदीकरची साममध्ये एंट्री झाली आहे, भूषणमुळे सामला एक चांगला आवाज मिळाला आहे. 


👉 सामची अँकर प्राची साळुंके न्यूज १८ लोकमत वाटेवर, तर विशाल सवणे ईटीव्ही भारतच्या वाटेवर  


👉तुषार शेटे याने जय महाराष्ट्रला जय महाराष्ट्र करून न्यूज १८ लोकमत जॉईन ... 


👉टीव्ही ९ मराठीची अँकर श्वेता वडके - दांडेकर  न्यूज १८ लोकमत मध्ये जॉईन होऊन एक महिना होत आहे. 


👉 अजिंक्य भातंब्रेकर लोकशाहीला रामराम करून न्यूज १८ लोकमतमध्ये श्वेतासोबत जॉईन झाला... 


👉 संदीप देसाई न्यूज १८ लोकमतमधून लवकरच साममध्ये


👉 रमेश जोशी झी २४ तास सोडून लवकरच साममध्ये 


👉 लोकशाही चॅनल मध्ये गळती सुरूच आहे. एचआरच्या ठोकशाहीमुळे संपादक नितीन भालेराव राजीनामा देण्याची शक्यता आहे. 


जाता जाता 


👉 टीआरपी घोटाळ्यामुळे चॅनलचा टीआरपी गेले तीन महिने बंद आहे. आणखी दोन महिने टीआरपी येणार नाही. त्यामुळे जाहिरात  व्यवसायवर परिणाम झाला आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या