औरंगाबाद - पुढारीचे कार्यकारी संपादक धनंजय लांबे यांना पद्मश्रीने नारळ दिला असून, त्यांच्या जागी संजय वरकड यांची नियुक्ती केली आहे. आज १ मार्च रोजी वरकड यांनी कार्यकारी संपादकपदाची सूत्रे हाती घेतली आहेत.
संजय वरकड हे सकाळमध्ये जवळपास २० वर्षे काम केले आहे. बातमीदार, मुख्य बातमीदार, निवासी संपादक, संपादक अशी जबाबदारी त्यांनी औरंगाबाद सकाळमध्ये पार पाडली आहे.तसेच आयबीएन - लोकमतमध्ये मराठवाडा ब्युरो म्हणून चार वर्षे काम केलं आहे.
पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव असलेले संजय वरकड हे लेखक, कवी, वात्रटिकाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. औरंगाबाद जिल्हा साहित्य संमेलन तसेच विविध साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषविले आहे.
सहा महिन्यापूर्वी वरकड यांनी सकाळचा राजीनामा दिल्यानंतर पुढे कुठे जाणार ? याकडं लक्ष वेधलं होतं.अखेर त्यांनी पुढारीमध्ये एंट्री केली असून, आज त्यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. व्यवस्थापक कल्याण पांडे यांनी त्यांचे स्वागत केले.
नूतन कार्यकारी संपादक संजय वरकड, मावळते कार्यकारी संपादक धनंजय लांबे ( मध्यभागी ) व्यवस्थापक कल्याण पांडे |
संजय वरकड यांचे सकाळमध्ये वरकडी नावाचे चारोळी सदर गाजले होते. वरकडांची वरकडी आता पुढारीमध्ये सुरु होणार का याकडं लक्ष वेधलं आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पुढारी टीममध्ये उत्साह संचारला आहे.
0 टिप्पण्या