लोकमत नव्हे फेकमत ...

जळगावची ती बातमी ठरली फेक... 

कारवाई  करण्याचे गृहमंत्र्याचे संकेत...   

जळगाव -  जळगावच्या आशादीप शासकीय महिला वसतीगृहात काही पोलीस कर्मचारी व इतर बाहेरच्या पुरुषाकडून मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडले जाते, अशी फेक न्यूज दैनिक लोकमतमध्ये ३ मार्च रोजी प्रसिद्ध झाली होती. 




" धक्कादायक, मुलींना कपडे काढून नृत्य करायला लावले" या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या या बातमीचे पडसाद गुरुवारी विधिमंडळात उमटले होते. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निवेदन करताना, सदर वृत्त चुकीचे असल्याचे सांगून खोटे वृत्त देणाऱ्या वृत्तपत्राची चौकशी करण्याचे आदेश दिले.


लोकमतच्या या फेकन्यूजचा दैनिक लोकपत्र आणि दिव्य मराठीने खरपूस समाचार घेतला आहे. 





सोलापूर लोकमतमध्ये काही दिवसापूर्वी 'अतिद्राक्ष खाल्ल्याने युवकाचा मृत्यू' ही  फेक न्यूज प्रसिद्ध झाली होती, त्यावर कडवट प्रतिक्रिया उमटल्या होत्या. द्राक्षभूमी  प्रतिष्ठानने वकिलामार्फत नोटीस देऊन कोर्टात खेचण्याचा इशारा दिला आहे. सोलापूर लोकमत पाठोपाठ आता जळगाव लोकमतने पुन्हा माती खाल्ली आहे. 



सनसनाटीच्या नावाखाली दर्डा शेठच्या लोकमतमध्ये नेमकं चाललं तरी काय ? असा प्रश्न वाचकांना पडला आहे.  

आशादीप वसतीगृह प्रकरण आणखी इनसायडर स्टोरी ...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या