महेश मोतेवारने 'दगडुशेठ'ला दान दिलेले दीड किलो सोने जप्त !



पुणे : मी मराठी, लाइव्ह इंडिया  चॅनलचा  मालक महेश मोतेवार चिटफ़ंड घोटाळा प्रकरणी अटकत आहे. समृद्ध जीवन घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या महेश मोतेवार याने  श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला दान केलेले सोन्याचे दीड किलोचे दागिने गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) ताब्यात घेतले आहेत.


महेश मोतेवारने सन २०१३ मध्ये दगडूशेठ गणपतीला सोन्याचा हार, त्रिशुळ, परशू असे ६० लाख ५० हजार रुपयांचे दीड किलोचे दागिने अर्पण केले होते. धर्मादाय आयुक्तांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली. मोतेवारने ठेवीदारांच्या पैशातून 'दानधर्म' केल्याचे सीआयडीच्या तपासात समोर आले होते.


समृद्ध जीवन मल्टिस्टेट पर्पज को-ॲापरेटिव्ह सोसायटी लिमिटेडने देशभरातील लाखो गुंतवणूकदारांना २ हजार ५१२ कोटींचा गंडा घातला आहे. या प्रकरणी मोतेवारची २०७ कोटींच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली आहे. या प्रकरणात मोतेवारला सन २०१५ मध्ये अटक करण्यात आली आहे.

'दगडूशेठ न्यासा'च्या विश्वस्तांनी संपूर्ण सहकार्य करुन हे दागिने सीआयडीकडे सुपूर्द केले.


समृध्दी फुडसने शेळीपालन व्यवसायात गुंतवणूक करुन मोठा आर्थिक फायदा मिळवण्याचे आमिष दाखवून हजारो शेतकऱ्यांची फसवणूक केली होती. यासंदर्भात महाराष्ट्रासह इतरही अनेक राज्यात मोतेवार यांच्याविरुध्द गुन्हे दाखल आहेत.सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनूसार, आम्ही मोठी किंमत असलेला सोन्याचा हार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर व्यवस्थापनाकडून जप्त केला आहे. महेश मोतेवार यांनी केलेल्या गुन्ह्याच तपास सध्या सीआयडीची आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.


त्यांनी गुंतवणूदारांना फसवणूक मिळवलेल्या पैशाची कोठे कोठे गुंतवणूक केली आहे, हे तपासले जात आहे. याचा शोध सुरू असतानाच आम्हाला एक छायाचित्र सापडले, त्यामध्ये मोतेवार हे श्रींच्या मुर्तीस हार अर्पण करत असल्याचे दिसत होते. त्यानूसार हा हार जप्त करण्यात आला आहे. हा हार शेतकरी व इतर गुंतवणूकदारांची फसवणूक करुन घेतलेल्या पैशातून केला गेला आहे. सध्या महेश मोतेवार हे ओरिसा राज्यातील कारागृहात आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे खजिनदार महेश सुर्यवंशी यांनी सांगितले की, सीआयडीने आमच्याशी संपर्क साधला होता.


'दगडूशेठ न्यासा'चे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सांगितले की, गोरगरिबांचा तळतळाट घेऊन अर्पण केलेले दागिने बाप्पाही स्वीकारणार नाही, अशी आमची भावना आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या