मुंबई - चार महिन्यापूर्वी टीआरपी घोटाळा उघडकीस आल्यानंतर महारष्ट्रासह देशभरातील न्यूज चॅनलचा टीआरपी येणे बंद झाले आहे. त्यामुळे मराठी न्यूज चॅनलमधील स्पर्धा संपली असून, काही चॅनलमध्ये केवळ पाट्या टाकणे सुरु आहे.
मराठीमध्ये एबीपी माझा, साम , टीव्ही ९ मराठी, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, लोकशाही, जय महाराष्ट्र हे सात न्यूज चॅनल सुरु आहेत. औरंगाबादचे AM न्यूज चॅनल बंद पडले आहे.
गेले अनेक महिने एबीपी माझा, साम , टीव्ही ९ मराठी यांच्यात नंबर १ साठी स्पर्धा सुरु होती. झी २४ तास चौथ्या तर न्यूज १८ लोकमत पाचव्या क्रमांकला होते. झी २४ तासचा टीआरपी १२ ते १४ तर न्यूज १८ लोकमतचा टीआरपी ८ ते १० होता.
झी २४ तास मध्ये निलेश खरे जॉईन झाल्यामुळे टीआरपी वाढेल, अशी शक्यता गृहीत धरली जात होती, तर साम मध्ये राजेंद्र हुंजे न्यूज एडिटर आल्यामुळे सामचा टीआरपी कायम राहणार का ? याकडं लक्ष वेधलं होतं , पण टीआरपी बंद झाल्यामुळे झाकली मूठ ... अशी अवस्था आहे.
गेले वर्षभर कोरोना वाढल्यामुळे जाहिरात व्यवसाय थंडावला आहे. त्यात टीआरपी बंद झाल्यामुळे जाहिरात व्यवसायावर परिणाम झाल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. टीआरपी बंद झाल्यामुळे काही चॅनलमधील कर्मचारी आळसी झाले असून, दिवसभर गॉसिप करून कामाचा तास पूर्ण करणे , इतकेच काम त्याना उरले आहे.
जाता -जाता
एबीपी माझाचे ज्येष्ठ न्यूज अँकर प्रसन्न जोशी लवकरच साम मध्ये संपादक म्हणून जॉईन होणार आहेत.
0 टिप्पण्या