वर्ष झाली दहा...दोस्तहो,

वर्ष झाली दहा...

बेरक्याची वेबसाईट

रोज पहात रहा...


कुठं काय शिजतय

कुठं काय भिजतय

कोण जात्यात,कोण सुपात

कोण तुपात तळतय

 

सगळ्याची खबरबात

एकदम सुपरफास्ट

कानामात्रा टाकोटाक

लाईव्ह टेलीकास्ट 


सगळेच आपले...

नाही आपला तुपला 

वाट सोडून वागला

की - तो मात्र खपला 


मालकशाही गेली उडत

आम्ही नाही चिवडत 

मस्काबाजी छक्के पंजे

आम्हाला नाही परवडत 


आमचं कसं सगळं

ढिनच्याक रोखठोक

खऱ्यासाठी पदरमोड

खोट्यासाठी ओले फोक 


खरं सांगू का भावानों

वाईट नका वाटून घेऊ

सगळेच ए टू झेड 

झालेत भोजनभाऊ


अभ्यास आणि अस्मिता 

झालीय आता दुर्मिळ

शिंगे मोडून वासरात 

बसू लागलेत बैल


इटुकली पिटुकली 

करतात पळपळ

सगळ्याच्यांच पोटात 

काही तरी मळमळ 


उंदरं आपल्या टाळूला 

म्हणू लागली गंडस्थळं

अन् हत्ती अंग चोरुन सनी

शोधू लागली बीळं


म्हणून म्हणतो दोस्तहो

गरज आहे बेरक्याची

भल्यासाठी लंगोटी 

अन् नाठाळाला काठीची 


काळ आहे बीकट 

राखा आपली ऐकी

आज काल  कोणीबी 

करतय फेकाफेकी 


- रवींद्र तहकीक 

7888030472

Post a Comment

0 Comments