मानबिंदूच्या कोल्हापूर आवृत्तीला झालंय तरी काय ?

ऑक्सिजन ट्रेनचा पत्ता नसताना यांनी वितरणही केले

कोल्हापूर - अपुरी माहिती, चुकीचे सोर्स आणि मलाच सगळे माहिती यांचे मिश्रण म्हणजे कोल्हापुरातील मानबिंदूची पत्रकारिता झाली आहे. चुकीच्या बातम्या छापून खुलासा छापण्याचा यांनी सपाटाच लावला असून वारंवार खुलासे छापून यांनी दर्डा शेठवर मान खाली घालण्याची वेळ आणली आहे. विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन ट्रेन येणार, ट्रेन आली, ट्रेनमधील ऑक्सिजनचे कोल्हापूर शहरातील हॉस्पिटलमध्ये वाटप अशा कल्पोपल्पीत बातम्या प्रसिद्ध केल्याने हसे करून घेतले आहे. 
   मानबिंदूत न फुललेल्या वसंताची आणि बकवास मुख्य बातमीदाराची स्वाभिमानी नेत्याच्या मध्यस्थीने एंट्री झाल्यानंतर चुकीचा आणि हुकुमशाही पद्धतीने कारभार सुरू आहे. काही लोकांची तळी उचलत एककल्ली बातम्या प्रसिद्ध होतात. तर अनेकांना टार्गेट करून उलट-सुलट बातम्या प्रसिद्ध करून त्रास दिला जातो.

   न फुललेल्या वसंताने दर्डा शेठला भली मोठी आश्वासने व दिवास्वप्ने दाखवून एंट्री केली. मात्र, मानबिंदूचा वापर आपल्या छानछौकी पूर्ण करण्यासाठीच केला आहे. त्यामुळेच त्याच्यावर 'कास्टिंग काऊच'चा गुन्हा दाखल झाला. दर्डा शेठसमोर या प्रकरणाची पावती 'पद्मश्रीं'वर फाडून खुर्ची टिकवण्यात यशस्वी झाला. यातून बोध न घेताच  त्याच्या सांगली- कोल्हापूर व्हाया आंबोली, सातारा, पुना-बेंगलोर ते मुंबईपर्यंतच्या म्हातापणातील गुलाबी प्रकरणे समोर येतच आहेत. तर ज्याच्या ओंजळीने हा पाणी पितो त्या 'बकवास'च्या संगतीने यांची मनमानी सुरू आहे. चुकीच्या बातम्या पेरण्यात यांचा हातखंडा असून काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या ओठी चुकीची माहिती घालून बातमी छापली होती. त्यावेळीही खुलासा छापून 'जवळ'च्या लोकांना पाठिशी घातले होते. या दोघांकडून प्रामाणिक सहकारी कर्मचाऱ्यांची छळवणूक तर  चमचेगिरीवाल्यांची पाठराखण सुरू आहे.


  चार दिवसापासून यांचे ऑक्सिजन ट्रेनचे पुराण सुरू आहे. विशाखापट्टणम येथून ट्रेन येणार.रेल्वे स्ट़ेशनवर टॅंकर उतरण्याची तयारी, कोल्हापुरात ट्रेन आली. शहरातील हॉस्पिटलमध्ये गॅसचे वितरण अशा बातम्या छापल्या. पण ही ट्रेन आलीच नाही. तोंडावर  पडल्याने खुलासा छापावा लागला.

Post a Comment

0 Comments